पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 04:13 PM2018-08-08T16:13:47+5:302018-09-29T17:42:32+5:30
येवला : येवला तालुक्याकडे पावसाने सपशेल पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. पावसाळा सुरु होऊन समाधानकारक पाऊस न झाल्याने चिंतेत वाढ झाली आहे. विहीरी व कुपनलीका कोरड्या पडल्याने आहे ती पिके वाचवण्यासाठी शेतकरी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परंतू पाण्याअभावी बहुतांशी पिके हातची गेली आहेत. त्यामुळे आधिच विविध संकटात असलेला शेतकरी दुबार पेरणीच्या संकटाने धास्तावला आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात तीन ते चारवेळा मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे बळीराजाने खरीप पिकांसाठी पेरणीपूर्व मशागत आटोपली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे. तो आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने विजेच्या वादळी वाºयासह हजेरी लावली होती. ठिकठिकाणी विजेचे खांब कोलमडले होते तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने एक ते दोन दिवस वीज प्रवाह खंडित झाला होता. बऱ्याच ठिकाणी झाडे रस्त्यात कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती, तर काही ठिकाणी घराचे छप्पर उडाल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. परंतू गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने चिंता वाढली आहे.