दर नसल्याने सिमला मिरची शेतातच पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:17 AM2021-08-24T04:17:58+5:302021-08-24T04:17:58+5:30
ब्राह्मणगाव : सध्या सिमला मिरची, टमाटा, कोबीला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून, येथील ...
ब्राह्मणगाव : सध्या सिमला मिरची, टमाटा, कोबीला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून, येथील राकेश बाळासाहेब जाधव यांनी त्यांच्या शेतात तीन एकरमध्ये लावलेली सिमला मिरची तशीच सोडून द्यावी लागल्याने त्यांचे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
जाधव यांनी त्यांच्या तीन एकर क्षेत्रात मोठा खर्च करून सिमला मिरचीचे उत्पादन घेतले. पण मिरचीला फक्त चार पाच रुपये किलो भाव मिळत असल्याने मिरचीची रोप लावणी, त्याची वाढ झाल्यावर बांधणी, फवारणी, काढणीचा खर्च ही निघत नसल्याने तयार सिमला मिरचीचे पीक तसेच सोडून दिले आहे. त्यामुळे त्यांचे आतापर्यंत लाखोंचे नुकसान झाले आहे. पुन्हा शेतातील उभे पीक काढण्यासाठी त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. सध्या परिसरात कोबीसह टमाट्याचीही लागवड मोठ्या प्रमाणात आाहे. कोबी, टमाटा यांनाही दर नसल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. कोबीवर करपा रोगाने अडचण निर्माण केली असून फवारणीसाठी खर्च होतच आहे. त्यात दर नसल्याने आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
--------------------
ब्राह्मणगाव येथील शेतकरी राकेश जाधव शेतातील सिमला मिरचीचे तयार पीक दाखवताना. (२३ ब्राह्मणगाव १)
230821\23nsk_10_23082021_13.jpg
२३ ब्राह्मणगाव १