मोबदला न मिळाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 04:06 PM2019-06-12T16:06:53+5:302019-06-12T16:07:04+5:30
कुशेगाव : बारा वर्षांपूर्वी साठवण तलावासाठी जमीन संपादित
घोटी : कुशेगाव ता. इगतपुरी येथील साठवण तलावासाठी १२ वर्षांपूर्वी संपादित झालेल्या जमिनीची भरपाई देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत आहे. शेकडो वेळा प्रयत्न करूनही संपादित झालेल्या ४० ते ४५ एकर जमिनीची अडीच कोटी रु पयांची भरपाई मिळत नसल्याने बाधित आदिवासी शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. मृद आणि जलसंधारण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालयाच्या खेटा मारून वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.
इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव येथे साठवण तलावासाठी शासनाने १२ वर्षांपूर्वी ४० ते ४५ एकर जमिनीचे संपादन केले होते. यावेळी शेतकऱ्यांना तातडीने योग्य ती भरपाई देण्याबाबत सांगण्यात आले होते. यावर्षीही या तलावांची जलयुक्त शिवार योजनेमधुन दुरु स्ती करण्यात येत आहे. ह्या भूसंपादनामुळे येथील आदिवासी शेतकरी भूमिहीन झाले असून त्यांना उपजीविकेसाठी रानोमाळ भटकावे लागत आहे. ह्या सर्व जमिनीची एकंदरीत भरपाई अडीच कोटी रु पयांच्या आसपास आहे. ही भरपाई मिळण्यासाठी शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ते मंत्रालयापर्यंत शेकडो वेळा प्रयत्न केले. ह्याबाबतची फाईल गायब असल्याचा शेतक-यांना दाट संशय आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यालयात त्यांना लाल फितीचा अनुभव येत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप भरपाई देण्याबाबत अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. शासनाकडून टोलवाटोलवी करून कोट्यवधी रु पये भरपाई मिळत नसल्याने आक्र मक शेतक-यांनी सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी यांची भेट घेऊन कैफियत मांडली. त्यांनी याबाबत भूसंपादन खात्याकडे शेतक-यांना पाठवून दिले. तिथेही शेतक-यांना दाद मिळू शकली नाही. परिणामी वैतागलेल्या शेतकºयांनी आता आक्र मक पवित्रा घेतला आहे.