रोपेच नसल्याने शेतकरी देताहेत कांदा बियाणे पेरणीला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 05:49 PM2020-10-11T17:49:13+5:302020-10-11T17:49:28+5:30
राजापूर : अवेळी झालेल्या जोरदार मुसळधार पावसाने परिसरातील शेतकऱ्यांकडे कांदा रोपेच शिल्लक राहिले नाही. परिणामी शेतकरी वर्गाने वेगवेगळे प्रयोग राबवून कांदा पेरणीला पसंती दिली आहे.
राजापूर : अवेळी झालेल्या जोरदार मुसळधार पावसाने परिसरातील शेतकऱ्यांकडे कांदा रोपेच शिल्लक राहिले नाही. परिणामी शेतकरी वर्गाने वेगवेगळे प्रयोग राबवून कांदा पेरणीला पसंती दिली आहे.
यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाल कांदा लागवडीसाठी क्षेत्र राखीव ठेवले, पण गेली दोन महिनाभरापासून उष्ण, दमट वातावरण तर कधी मुसळधार पाऊस, यामुळे लाल कांदा रोपे झोडपली गेली. रोंपावर बुरशीजन्य रोग पडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे कांदा रोपे जमिनीतच सडली. अनेक शेतकºयांनी रोपच शिल्लक न राहिल्याने नांगर घातला तर काही शेतकºयांनी त्याच जमिनीत पुन्हा बियाणे पेरणी केली. साधारणत: सप्टेंबर, आॅक्टोंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात लाल कांदा लागवड होत असते. पण या वर्षी मात्र शेतकºयांना कांदा लागवडीसाठी रोपे तयार होत नसल्याने लाल कांदा लागवडीस उशिर होत आहे. मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी खर्च करु नही रोपे नष्ट झाल्याने शेतकºयांनी यावर उपाय शोधत ट्रॅक्टरने पेरणी यंत्राच्या सहाय्याने कांदा बियाणे पेरणीवर भर दिला आहे.
कमी वेळात, कमी खर्चात आणि कमी मशागतीत कांदा लागवड होत आहे. हजारो रु पये खर्चाची बचत होऊन वेळ वाचत आहे. सारे पाडणे, वाफे बांधणे हा खर्च वाचून थेट कांदा लागवड होत असल्याने परिसरात शेतकºयांनी यंत्राच्या सहाय्याने कांदा बियाणे पेरणी करण्याला पंसती देत आहे.
मागील वर्षी आम्ही चार एकर शेतात लाल व उन्हाळ कांद्याची ट्रॅक्टरने कांदा पेरणी केली होती व कांद्याचे उत्पादन चांगले निघाले होते. यावर्षी कांदा पेरणी केली. यामुळे वेळ व पैशाची बचत झाली आहे.
- काशिनाथ चव्हाण, शेतकरी, राजापूर.