साठवणीची सोय नसल्याने टंचाई
By admin | Published: March 6, 2017 12:42 AM2017-03-06T00:42:43+5:302017-03-06T00:42:53+5:30
त्र्यंबकेश्वर : दरवर्षी जानेवारीअखेर व फेब्रुवारीपासून सुरू होणारे टंचाई प्रस्ताव यावर्षी मात्र एक वर्ष उशिराने सुरू झाले आहेत. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे प्रस्ताव उशिराने सुरू झाले आहेत.
त्र्यंबकेश्वर : दरवर्षी जानेवारीअखेर व फेब्रुवारीपासून सुरू होणारे टंचाई प्रस्ताव यावर्षी मात्र एक वर्ष उशिराने सुरू झाले आहेत. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे प्रस्ताव उशिराने सुरू झाले आहेत.
दि. ३ मार्चपर्यंत त्र्यंबक पंचायत समितीकडे सोमनाथनगर मेटघर किल्ल्याचे प्रस्ताव दाखल झाले होते. सोमवारी जवळपास ८ ते १० प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. मूलवड गंगाद्वारची मेट ही गावे वाड्यापाडे आदि भागातील लोक तर समक्षच आले होते. त्यावेळेस मावळत्या पदाधिकाऱ्यांची शेवटची बैठक (दि. ३ मार्च) संपन्न झाली.
गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी तातडीने प्रस्ताव तयार करण्यासाठी संबंधितांना सांगितले. यावेळी मेटघरचे ग्रामसेवक यांनाही पाचारण करण्यात आले होते. त्र्यंबक पंचायत समितीने पाणी टंचाई आराखडा तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता.
आता पंचायत समिती उपाययोजना करून टँकर वगैरेंचे प्रस्ताव पाठवू शकेल. टंचाई आराखडा तीन टप्प्यांत केलेला आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर- पहिला टप्पा, जानेवारी ते मार्च- दुसरा टप्पा व शेवटचा टप्पा एप्रिल ते जून. पहिल्या टप्प्यात सहसा टंचाई भासत नाही. आता दुसरा टप्पा सुरू झाला असून, टंचाई प्रस्ताव येण्यास सुरु वात झाली आहे. या प्रस्तावांची दखल गटविकास अधिकाऱ्यांमार्फत तातडीने तहसील कार्यालयाकडे पाठविले जातील.
दरम्यान, टंचाई आराखड्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देवगावच्या ढोलेवाडी, लचके वाडी, खरशेतचे पांगूळघर, जांभूळपाडा, सारवण, कसोली, मुरु महट्टी, शेंद्रीपाडा, सादडपाडा, मूलवडचा करंजपाणा, चौरापाडा, वळण सावरपाडा, होलदारनगरचा बोरपाडा, झारवड खुर्दची डगळेवाडी, चिंचवडचा बोरीपाडा, भानसमेट, बोडिंगपाडा, मेटघर किल्ला, गंगाद्वार, विनायक खिंड, महादरवाजाची मेट, सुपलीची मेट, जांबाची वाडी, पठारवाडी या गावांचा समावेश आहे. (वार्ताहर)