लॉकडाउनमुळे गोदेने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 08:31 PM2020-04-17T20:31:41+5:302020-04-18T00:27:20+5:30

चांदोरी : लॉकडाउनमुळे गोदावरी नदीने मोकळा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर गोदापात्र ग्रामीण व शहरी भागात प्रथमच प्रदूषणमुक्त बघायला मिळाले. मानवी संपर्कापासून दूर राहिल्याने पाणी नितळ आणि स्वच्छ बनले आहे.

 Due to the lockdown, Godine took a deep breath | लॉकडाउनमुळे गोदेने घेतला मोकळा श्वास

लॉकडाउनमुळे गोदेने घेतला मोकळा श्वास

Next

चांदोरी : लॉकडाउनमुळे गोदावरी नदीने मोकळा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर गोदापात्र ग्रामीण व शहरी भागात प्रथमच प्रदूषणमुक्त बघायला मिळाले. मानवी संपर्कापासून दूर राहिल्याने पाणी नितळ आणि स्वच्छ बनले आहे.  प्रामुख्याने कारखाने बंद असल्याने पाण्यात रासायनिक घटक मिसळणे थांबले आहे. चांदोरी येथील गोदातीरी घाटावर पाणी नितळ झालेले आहे. अनेक वर्षांपासून नाशिककरांनी गोदावरीला संपूर्णपणे प्रदूषित केले होते.
लॉकडाउनमुळे लोकांचा गोदावरी नदीसोबत संपर्कसंपुष्टात आल्यामुळे तिला चांगले दिवस आले आहे. धुणी भांडी ,वाहने धुणे, पोहणे, जनावरे धुणे हे उपद्व्याप आता थांबले आहे. नदीकाठची गर्दीही संपली आहे. हे चित्र रामकुंडापासून ते नांदूरमध्यमेश्वरपर्यंत दिसत आहे. तसेच नदीला पाण्याचे आवर्तन आल्यामुळे अगोदर असलेले शेवाळयुक्त पाणी व पाणवेली वाहून गेल्याने आता पाणी एकदम स्वछ व नितळ बनले आहे. तसेच गोदाकाठ भागातील गावांत मासेमारी बंद असल्याने तेथील जलचरही पाण्यात मुक्तपणे संचार करत आहे. सध्या संचारबंदीत सर्व उद्योग बंद असल्याने तेथील रासायनिक उत्सर्जन थांबले आहे. त्यामुळे गोदावरी तूर्तास प्रदूषण मुक्त झाली आहे.

Web Title:  Due to the lockdown, Godine took a deep breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक