डाळिंबाचे भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले
By admin | Published: August 19, 2014 12:07 AM2014-08-19T00:07:41+5:302014-08-19T01:24:18+5:30
डाळिंबाचे भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले
ब्राह्मणगाव : कांद्याच्या घसरत्या भावापाठोपाठ डाळिंबाचेही भाव कमी झाल्याने डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून, डाळींब बागांवर होणारा खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
आधीच डाळींबबागांना वातावरणाने तेल्या रोगाने पछाडले आहे. निसर्गाशी दोन हात करत कसे बसे डाळींब उत्पादन केले. त्यात १५ आॅगस्टनिमित्त देशाच्या सीमारेषा सिल केल्याने बाजारात डाळिंबाची आवक वाढल्याने डाळिंबाचे बाजार घटले आहे.दुष्काळानंतर पाणीटंचाई, पावसाची दिरंगाई, महागाईत वाढ, डिझेल, पेट्रोलच्या वाढत्या किमती, खरिपाच्या उशिरा पेरण्या तेही कमी पावसामुळे उत्पन्न येईलच याची खात्री नाही. या सर्व गोष्टी पाहता येणारी परिस्थिती किती भयावह अडचणीची आहे या विवंचनेत शेतकरी आहेत.
बागलाणच्या पूर्व भागात यंदा पावसाने पूर्णत: दांडी मारली आहे. पश्चिम भागात पावसाची परिस्थिती चांगली असल्याने धरणे तरी भरण्याच्या मार्गावर आहेत. कांदा, डाळिंबाचे भाव कधी वाढतील याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहे.