महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 03:57 PM2018-09-16T15:57:00+5:302018-09-16T15:57:11+5:30
सुदर्शन सारडा ओझर : परिसरातील शेतकºयांना महावितरण कंपनीने प्रत्यक्ष रिडिंग न घेताच बिले वेळेपूर्वीच वाटप केल्याने ऐन दुष्काळात शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
सुदर्शन सारडा
ओझर : परिसरातील शेतकºयांना महावितरण कंपनीने प्रत्यक्ष रिडिंग न घेताच बिले वेळेपूर्वीच वाटप केल्याने ऐन दुष्काळात शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
कृषिपंपांना लागणाºया वीजबिलाची पहिली देयक तारीख जाऊन अर्धा महिना लोटला तरी सदर बिले अदा झालेली नसताना सोळा हजार शेतिपंपांच्या मीटर रिडिंगमध्येदेखील शेतकºयांनी संशय व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी मीटर नसताना रिडिंग कसे घेतले गेले, असा सवाल उपस्थित होत आहे.
निफाड तालुक्यातील ओझर हे उपविभागीय कार्यालय असून, याअंतर्गत ओझर, मोहाडी, चांदोरी, सायखेडा, म्हाळसाकोरे ही उपकार्यालये समाविष्ट आहेत. तीन महिन्यांतून एकदा येणाºया कृषिपंपाच्या बिलांचा बट्ट्याबोळ झाला असून, कंत्राट घेणाºया कंपनीने मीटर बंद असताना नेमके कोणते व कसे रिडिंग घेतले हा संशोधनाचा विषय ठरला आहे.
ओझर विभागात एकूण १६,७९७ कृषिपंप ग्राहक आहेत. त्यातील अनेक ठिकाणची स्थिती वेगळी असून, कोणत्याही प्रकारचे रिडिंग न घेता अवाजवी रकमेची बिले दिली गेली असून, याला नेमके जबाबदार कोण? हा मुख्य मुद्दा आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे बिले वेळेवर न मिळाल्यामुळे ग्राहकांना दंडापोटी दहा ते पन्नास रु पये प्रत्येक बिलापोटी भरावे लागणार आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये नाराजी आहे.
चौकट-
१) मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत ज्या ग्राहकांनी सहभाग घेतला आहे त्यांना नियमानुसार वेळेत हप्ता भरणे बंधनकारक होते; परंतु अशा ग्राहकांना बिले वेळेवर न मिळाल्याने शेतकरी या योजनेपासुन वंचित राहिला आहे.
२) आजदेखील ओझर उपविभागांतर्गत एकूण चालू स्थितीत किती कृषिपंप मीटरधारक आहेत, त्यातील किती मीटर सुरू आहेत तसेच ज्याचे मीटर सुरू आहेत अशा कृषिपंपधारकांना मीटर रीडिंगप्रमाणे बिल येते का, तसेच रीडिंग घेण्याचे काम कोण करते, आत्तापर्यंत किती कृषिपंपधारकांची बिले दुरु स्ती झाली व बिल चुकले म्हणून कोणावर कार्यवाही केली का, असे एक ना अनेक सवाल उपस्थित होत असताना ‘सबकुछ रामभरोसे’ असल्यागत स्थिती आहे.
प्रतिक्रि या-
माझ्या बिलावर एप्रिल २०१८ ची मीटर रिडिंग १६४६१ युनिट एवढी नमूद आहे आणि सद्य:स्थितीत म्हणजेच जून २०१८चे रिडिंग १८२६१आहे; परंतु प्रत्यक्ष पाहणी केली असता मीटरवरील रिडिंग ही १३७९८ अशी होती. त्यामुळे आलेले बिल चुकले म्हणून कार्यालयात गेलो असता त्यांनी बरोबर बिल आहे असे ठणकावून सांगितले. चुकीच्या बिलांची तक्रार घेऊन येणाºया शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांनाच खोटे ठरविण्याचा प्रकार सुरू आहे. अशा बेजबाबदार संबंधित कर्मचारी व अधिकाºयांची योग्य चौकशी झाली पाहिजे.
- तुकाराम काळू मोरे
शेतकरी,ओझर.
फोटो-
1).तुकाराम काळू मोरे यांचा फोटो(16ओझरतुकाराम)
2)त्यांच्या शेतातील मीटरचे फोटो(16ओझरतुकाराम)