मनसेचा एकही उमेदवार नसल्यामुळे पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:17 PM2017-11-26T23:17:24+5:302017-11-27T00:32:33+5:30

मात्र यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकाही उमेदवाराचा अर्ज नसल्याने मनसेचे इंजिन कसारा घाटात थांबले की काय? अशी चर्चा आता शहरात होऊ लागली आहे.यामुळे मनापासून काम करणाºया कार्यकर्त्यांची पंचाईत झाली आहे. इगतपुरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले.

Due to no candidate, MNS is scared | मनसेचा एकही उमेदवार नसल्यामुळे पंचाईत

मनसेचा एकही उमेदवार नसल्यामुळे पंचाईत

googlenewsNext

घोटी : मात्र यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकाही उमेदवाराचा अर्ज नसल्याने मनसेचे इंजिन कसारा घाटात थांबले की काय? अशी चर्चा आता शहरात होऊ लागली आहे.यामुळे मनापासून काम करणाºया कार्यकर्त्यांची पंचाईत झाली आहे. इगतपुरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले.  मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष याच तालुक्याचे असताना सुद्धा यंदा मनसेचे उमेदवार का उभे केले नाही. याचे उत्तर मात्र, गुलदस्त्यात आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत घोटी गटातून मनसेच्या जिल्हा उपाध्यक्षांचा थोड्याच मतांमुळे पराभव झाला. तालुक्यात मनसेची मोठी ताकद असताना शहरात मात्र मनसेचे पदाधिकारीच शिल्लक राहिले नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे शहरात राष्ट्रवादी पक्षाप्रमाणे मनसेची खळखळ झाली असल्याचे राजकीय पक्षातून बोलले जाते.
गत पंचवार्षिक निवडणुकीत मनसेने आपले नशीब आजमविले होते. अनेक प्रभागात त्यांच्या उमेदवारांना बºयापैकी मतदान झाले होते; मात्र गेल्या वर्षभरापासून मनसेच्या अनेक पदाधिकाºयांनी दुसºया पक्षात प्रवेश केला. तर अनेक पदाधिकारी निवडणुकीसाठी इच्छुक होते; मात्र गेल्या वर्षभरापासून मनसेच्या पदाधिकाºयांची कधी बैठकच झाली नसल्याचे बोलले जात आहे. तर वरिष्ठांनीदेखील तसे नियोजन घेण्याची तसदी घेतलीच नसल्याने शहरात मनसे पक्षाची घरघर  झाली असून, शहरात राष्ट्रवादीप्रमाणे मनसे पक्षाचेही अस्तित्व संपले आहे की काय? अशी चर्चा राजकीय पक्षांसह सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. 
मनसे जिल्हाध्यक्ष यांची भूमिकेबाबत नाराजी 
यंदाची इगतपुरी नगर परिषदेची निवडणूक ही बहुचर्चित झाली असून, गेल्या पंचवीस वर्षांत प्रथमच शिवसेनेच्या एकाधिकार शाहीसमोर सर्वच राजकीय पक्षांनी आवाहन उभे केले असल्याने ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. त्यात इगतपुरी शहरास विकासाच्या दृष्टीने वीस वर्ष मागे नेणाºया नेतृत्वास त्याची जाणीव करून देण्याची वेळ शहरवासीय साधत असताना मात्र मनसेचे जिल्हाध्यक्ष हे त्यास पूरक भूमिका घेत पाठबळ देऊन असल्याची चर्चा मनसे कार्यकर्तेच करत असल्याने याकडे पक्षाच्या वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज मनसे कार्यकर्ते व्यक्त करत आहे. मनसेसाठी शहरात पूरक वातावरण असताना जिल्हाध्यक्ष दुसºया पक्षास पूरक भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Due to no candidate, MNS is scared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.