लाइटबील न भरल्याने नाशिकच्या इनडोअर स्टेडीयमचा वीज पुरवठा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 03:37 PM2017-11-17T15:37:59+5:302017-11-17T15:38:40+5:30

 Due to not flooding the lightbill, disconnect the electricity supply of the indoor stadium of Nashik | लाइटबील न भरल्याने नाशिकच्या इनडोअर स्टेडीयमचा वीज पुरवठा खंडीत

लाइटबील न भरल्याने नाशिकच्या इनडोअर स्टेडीयमचा वीज पुरवठा खंडीत

Next


नाशिक- अश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडिअमधील वीज पुरवठा गेल्या आठ दिवसांपासून महावितरणने खंडीत करण्यात आला आहे. यामुळे वीज पुरवठ्यावर सुरु असलेले सेतू कार्यालय तसेच मैदानातील म्यूझिकवर सुरु राहणारे संगीत बंद झाले असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या गोष्टीला तब्बल आठ दिवस उलटुनही ढिसाळ व नियोजनशून्य कारभार असलेल्या मनपाकडून दखल घेतली जात नसल्याने क्रीडा प्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
अश्विननगर येथील राजे संभाजी इनडोअर स्टेडीयमची संपूर्ण वाताहत झाली असून, सर्वत्र घाण, माती साचलेली, अस्वछता, शौचालयाची दुरवस्था झालेली असतांनाच गेल्या आठ दिवसांपासून लाइटबील न भरल्याने महावितरण कंपनीच्या वतीने इनडोअर स्टेडीयमचा वीज वीजप्रवाह खंडित केला आहे. संपूर्ण इनडोअर स्टेडिअममध्ये धूळ व घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्योन याबाबत नुकतीच क्रंीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त करीत मनपा प्रशासनाचा निषेध नोंदविला. शिवसेनेचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून राजे संभाजी क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. याठिकाणी असलेल्या इनडोअर स्टेंडीयममध्ये खेळाडूंसाठी राहण्याची व्यवस्था तसेच इतर सुविधा करणे अपेक्षीत होते,परंतू निधी उपलब्ध नसल्याचे कारण मनपाकडून सांगण्यात येत आहे. सध्या थंडीचे दिवस असल्याने इनडोअर गेम खेळण्यासाठी सकाळपासून क्रीडाप्रेमींची गर्दी होते. मैदानालगतच उभारण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅकवरही नागरिक सकाळ व सायंकाळ फिरण्यासाठी येतात. याठिकाणी मनपाने बास्केटबॉल, बॅटमिंटन, व्हॉलीबॉल व अंतर्गत खेळ खेळण्यासाठी इनडोअर स्टेडिअम उभारले आहे. परंतू आजही याठिकाणी एका खाजगी शाळेच्या कार्यक्रमासाठी हे इनडोअर स्टेडीयम भाड्याने दिले असल्याचे दिसून आले आहे. परंतु या इनडोअर स्टेडिअममध्ये इनडोअर खेळ होणे अपेक्षित असताना मनपा मात्र हे इनडोअर स्टेडिअम खासगी कार्यक्रमांसाठी भाड्याने देत असल्याने क्रिडापे्रमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title:  Due to not flooding the lightbill, disconnect the electricity supply of the indoor stadium of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.