ओखी वादळाचा नाशिकच्या द्राक्ष बागांनाही फटका, रिमझीम पाऊस, ढगाळ वातावणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 03:50 PM2017-12-05T15:50:28+5:302017-12-05T15:57:39+5:30
ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक शहरासह परिसरात रिमङिाम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. या बेमोसमी पावसामामुळे द्राक्ष मान्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.
नाशिक : महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याला तडाखा देणाऱ्या ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक शहरासह परिसरात रिमङिाम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. या बेमोसमी पावसामामुळे द्राक्ष मान्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.
घड काढणीसाठी तयार असलेल्या द्राक्षबागांना या पावसापासून आणि ढगाळ वातावरणापासून सर्वाधिक धोका आहे. या द्राक्षांमध्ये साखरभरणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असल्याने प्रतिबंधात्मक औषधांची फवारणीही शक्य नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.तर फुलोऱ्यात असलेल्या बागांना वाचविण्याचासीठ प्रतिबंधात्मक फवारण्यांसह डावण्यापासून वाचविण्यासाठीही फवारणी करावी लागणार असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. परंतु, कर्ज काढून लागवड व देखभाल केल्यानंतर आता शेवटच्या टप्प्यात बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार असून त्यासाठी खर्चातही मोठय़ा प्रमाणात भर पडणार असल्याने शहर परिसरातील द्राक्ष बागायतदार शेतकरी चिताग्रस्त झाला आहे. द्राक्षाचे पीक मात्र वर्षातून एकदाच घेतले जाते शिवाय पीक उभे करण्यासाठी एकरी किमान चार लाख रु पये खर्च येतो तेव्हा बाग उभी राहते शिवाय चालू फळ धारणोपासून एकरी अडीच ते तीन लाख खर्च येतो त्यामुळे लाखो रुपये खर्च करून पीक विक्रीसाठी बाजारात येते. सध्या अनेक शेतकऱ्यांचे द्राक्ष पीक अंतिम टप्प्यात असून छाटणीनंतर तीन महिन्याचा कालावधी उलटून गेल्यामुळे बागेची मशागत व देखभालीची सर्व कामे आटोपली आहे. पीक तयार होण्याच्या अवस्थेत असून महागाडी खते, औषधे फवारणी करून झाली आहे. मजुरांचीही सर्व कामे आटोपली आहे आता केवळ पीक परिपक्व होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी बाकी असतांना नैसिर्गक आपत्तीचे संकट उभे ठाकल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागला असून लाखो रु पये खर्च करून द्राक्ष पिकाचा तोंडी आलेला घास हिरावला जातोय की काय, अशी भीती शेतकऱ्यामध्ये निर्माण झाली आहे.