पितृपक्षामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्या कडाडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 11:50 PM2018-09-25T23:50:50+5:302018-09-26T00:10:02+5:30
पितृपक्षाला प्रारंभ झाल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या पालेभाज्यांचे दर तेजीत आले आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांना गवार शंभर रुपये किलो, तर मेथी जुडी ४० ते ४५ रुपये दराने खरेदी करावी लागली.
पंचवटी : पितृपक्षाला प्रारंभ झाल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या पालेभाज्यांचे दर तेजीत आले आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांना गवार शंभर रुपये किलो, तर मेथी जुडी ४० ते ४५ रुपये दराने खरेदी करावी लागली. श्राद्धासाठी पालेभाज्यांचा वापर केला जातो. मेथीच्या भाजीला महत्त्व असते. भाजीची आवक कमी प्रमाणात असली तरी पितृपक्ष सुरू झाल्याने पालेभाज्या तेजीत आल्या. मंगळवारी (दि.२५) बाजार समितीत सायंकाळी झालेल्या लिलावात मेथीला ४२ रुपये असा बाजारभाव मिळाला. वातावरणात बदलामुळे मेथीची आवक घटली आहे. त्यातच पितृपक्ष सुरू झाल्याने मेथीसह अन्य फळभाज्यांना मागणी वाढल्याने बाजारभाव तेजीत आले. पितृपक्षामुळे गवार १०० रुपये किलो, डांगर ४० रुपये, दोडका ६० रुपये, आळूचे पान १० ते १५ रुपये (५ नग), कारले ४० रुपये किलो, तर मेथी जुडी ४० ते ४५ रुपये दराने खरेदी करावी लागत आहे.