राजकीय उदासीनतेमुळे ४२ रुग्णवाहिकांचा प्रस्ताव पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:14 AM2021-07-29T04:14:49+5:302021-07-29T04:14:49+5:30
चौकट=== रुग्णवाहिकेअभावी परवड नाशिक जिल्ह्यात ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, पाचशेहून अधिक उपकेंद्रे आहेत. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत ...
चौकट===
रुग्णवाहिकेअभावी परवड
नाशिक जिल्ह्यात ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, पाचशेहून अधिक उपकेंद्रे आहेत. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात, तसेच नजीकच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करताना रुग्णवाहिकेअभावी परवड झाली होती. अखेर प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी खासगी रुग्णवाहिका भाड्याने घ्याव्या लागल्या होत्या.
चौकट===
राजकीय उदासीनता
नाशिक जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या बळकटीकरणाला हातभार लावणाऱ्या ४२ रुग्णवाहिकांचा प्रस्ताव ग्रामविकास विभाग व आरोग्य मंत्रालयाकडे पडून असताना तो मंजूर करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील राजकीय नेतृत्व, तसेच लोकप्रतिनिधी कमी पडले आहेत. विशेष म्हणजे ग्रामविकास विभाग व आराेग्य खाते राष्ट्रवादीच्या ताब्यात असून, नाशिक जिल्ह्यात पुरवठामंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह राष्ट्रवादीचे सहा आमदार कार्यरत आहेत. मात्र, यापैकी एकानेही यासंदर्भात पाठपुरावा केला नसल्याचे सांगण्यात येते.