वीज कंपनीच्या निषेधार्थ धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:44 AM2017-12-14T00:44:58+5:302017-12-14T00:47:19+5:30

मालेगाव : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध करीत विविध मागण्यांसाठी शहर राष्टÑवादी काँग्रेस, तालुका मालेगाव पॉवरलूम संघर्ष समिती व लोकसंघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी येथील वीज वितरण कंपनीच्या मोतीभवन कार्यालयाला टाळे ठोकीत धरणे आंदोलन करण्यात आले. मंडळ अभियंता शैलेंद्र राठोड यांना निवेदन सादर करण्यात आले.

Due to the power company's protest | वीज कंपनीच्या निषेधार्थ धरणे

वीज कंपनीच्या निषेधार्थ धरणे

Next
ठळक मुद्देवीज कंपनीच्या निषेधार्थ धरणेवीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध


मालेगाव वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ येथील मोतीभवन कार्यालयाच्या प्रवेशद्वार परिसरात धरणे आंदोलन करताना माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल, नगरसेवक अतिक कमाल, युसूफ इलियास आदी.

मालेगाव : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध करीत विविध मागण्यांसाठी शहर राष्टÑवादी काँग्रेस, तालुका मालेगाव पॉवरलूम संघर्ष समिती व लोकसंघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी येथील वीज वितरण कंपनीच्या मोतीभवन कार्यालयाला टाळे ठोकीत धरणे आंदोलन करण्यात आले. मंडळ अभियंता शैलेंद्र राठोड यांना निवेदन सादर करण्यात आले.
गेल्या आठवड्यात विजेची तार मुलावर पडून त्याचा निष्पाप बळी गेला आहे. या घटनेला जबाबदार असणाºया अधिकाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, नादुरुस्त रोहित्र तातडीने बदलावेत, २४ तास वीजपुरवठा करावा, शहरातील बहुतांशी रोहित्र खराब झाले आहेत. यामुळे पूर्व भागात अंधाराचे साम्राज्य असते. अंधाराचा फायदा घेऊन भुरट्या चोºयांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एजन्सीकडून नादुरुस्त रोहित्राची तपासणी करून नव्याने बसवावे, यंत्रमाग व्यवसायाला सुरळीत वीजपुरवठा करावा, शहरातील जीर्ण तारा तातडीने बदलाव्यात, सक्तीचे भारनियमन बंद करण्यात यावेत, विजेची तार तुटून बालकाचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूस जबाबदार असणाºया अधिकाºयांवर गुन्हा दाखल करावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
या आंदोलनात मालेगाव पॉवरलूम संघर्ष समितीचे मोहंमद युनुस मोहंमद इलियास, लोकसंघर्ष समितीचे मोहंमद सलीम अब्दुल रऊफ, साजिद अन्सारी, अब्दुल मन्नानशेठ, हाफीज शब्बीर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Due to the power company's protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक