हद्दीच्या वादामुळे घोडकीचा घाट बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:37 PM2019-06-26T22:37:18+5:302019-06-26T22:38:19+5:30
पेठ : नाशिक व पेठ या दोन तालुक्यांना जोडणारा व सर्वात जवळचा समजला जाणारा रस्ता घोडकीच्या घाटातून जात असून, दोन्ही तालुक्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीच्या वादामुळे निम्म्या घाटात अवघड वळणावर रस्ता खराब असल्याने वाहनधारकांना कसरत करीत प्रवास करावा लागत असून, आगामी पावसाळ्यात केवळ १ किमी खराब रस्त्यामुळे प्रवाशांना ३० किमी फेरा घेऊन प्रवास करावा लागणार आहे.

पेठ तालुक्याचा विस्तार दक्षिण उत्तर असा असून, नाशिक-पेठ व नाशिक-हरसूल हे दोन मुख्य मार्ग आहेत. काही वर्षांपूर्वी कुळवंडी दोनवडे मार्ग थेट देवरगाव गिरणारेकडे जाणारा नवा रस्ता बनविण्यात आला. दोनवडे नजीक मोठ्या टेकडीला वळसा घालून घाटाचे काम पूर्ण होऊन रस्ता सुरू करण्यात आला. नाशिक व पेठ तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आपापल्या हद्दीत डांबरीकरण करून काम उरकते घेतले; मात्र ऐन घाटात हद्दीच्या वादामुळे एक किमी रस्ता तसाच राहिला, त्यामुळे प्रवाशांना अक्षरश: दगडातून मार्गक्रमण करावे लागत आहे. वाहनधारकांना पायी प्रवास करावा लागत आहे. पेठ तालुक्यातील कुळवंडी, घनशेत, दोनवडे, मानकापूर, शेवखंडी, आमलोण, पिंपळवटी, पाटेपासून गावांना नाशिकला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने जीवघेणी कसरत करून नागरिकांना प्रवास करावा लागतो. पावसापूर्वी या रस्त्याची किमान दुरुस्ती तरी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.वर्गणी काढून रस्तादुरु स्तीपेठ तालुक्यातून नाशिकला जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग असल्याने नाशिक शहरातून पेठ तालुक्यात नियमित प्रवास करणारे प्रवासी, अधिकारी व कर्मचारी यांना पावसाळ्यात वैयक्तिक वर्गणी करून जेसीबीच्या साह्याने रस्त्याची दुरु स्ती करून घ्यावी लागते, तर बहुतांश वाहनधारक प्रवाशांना उतरून रिकामे वाहन कसरत करून या मार्गावरून काढताना दिसून येतात.