पाऊस उघडल्याने बळीराजांची कामाची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 04:35 PM2020-09-03T16:35:42+5:302020-09-03T16:37:28+5:30

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिल्याने बळीराजांची इतर कामांची लगबग सुरू झाली आहे. परंतु प्रत्येक पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाल्याने शेतकरी वर्गाची डोकेदुखी वाढली आहे.

Due to the rain, Baliraja's work is almost over | पाऊस उघडल्याने बळीराजांची कामाची लगबग

पाऊस उघडल्याने बळीराजांची कामाची लगबग

googlenewsNext
ठळक मुद्देलखमापूर : पिकांतील तण ठरतेय बळीराजांची डोकेदुखी

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिल्याने बळीराजांची इतर कामांची लगबग सुरू झाली आहे. परंतु प्रत्येक पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाल्याने शेतकरी वर्गाची डोकेदुखी वाढली आहे.
दिंडोरी तालुक्यात संततधार होणारा पाऊस यामुळे शेतकरी वर्गाचे बरीच कामे बाकी होती. परंतु आता पावसाने उघडीप दिल्याने शेतातील इतर कामे करण्यासाठी बळीराजांची लगीन घाई सुरू झाली आहे. त्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामातील पिकांमध्ये तण मोठ्या प्रमाणावर झाल्याने ते काढण्यासाठी शेतकरी वर्गाची मोठी धावपळ होत आहे. सततधार पावसामुळे तण काढण्यासाठी तेवढा पुरेसा वेळ न मिळाल्याने बऱ्याच पिकामध्ये तण मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसून येत आहे.
टमाटा पिकामधील तण, सोयाबीन आदी पिकांमधील तण काढण्यासाठी शेतकरी वर्गाला मजुरांचा शोध घ्यावा लागत आहे. संततधार पावसाने रिपरिप झाल्याने मजुर वर्ग मिळणे कठीण होऊन बसले आहे. जरी मजुर वर्ग उपलब्ध झाला तर मजुरीचा जादा मोबदला द्यावा लागत आहे. पावसाने खरीपातील पिकाला काही ठिकाणी जीवदान दिले. तर काही ठिकाणी पिकांचे अतोनात हाल झाले आहे.
भाजीपाला पिकांला यंदाचा पावसाचा लहरीपणा खुप नडला आहे. महागडी बियाणे खरेदी करून शेतकरी वर्गाने भाजीपाला पिकांला पसंती दिली. परंतु अगोदरच्या काळात कमी पाऊस व नंतरच्या काळात मात्र पावसाची सततधार यामुळे शेतकरी वर्गाने जे भाजीपाला पिके घेतले, त्यावर पुर्णपणे कुºहाड कोसळली.

१) सततधार पावसामुळे यंदा खरीप हंगामातील पिकांमध्ये तण मोठ्या प्रमाणात उगवल्याने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे.
२) टमाटा पिकामधील निंदणीसाठी मजुरांची कमतरता.
३) मजुरीसाठी दुप्पट भावाची आकारणी.
४) पिके व भाजीपाला वाचविण्यासाठी बळीराजांची कसरत.

यंदा खरीपांच्या मध्यंतरानंतर पावसाने संततधार स्वरु प धारण केल्यामुळे पिकाला अथवा भाजीपाल्यावर औषधे, तणनाशक औषधे फवारणी न करता आल्याने यंदा सर्व खरीपांच्या पिकांमध्ये तणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु आता पावसाने उघडीप दिल्याने सर्व कामे पुर्ण करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करून पिके वाचविणार आहे.
- धनंजय दाते, शेतकरी, परमोरी.

Web Title: Due to the rain, Baliraja's work is almost over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.