पावसामुळे देखाव्यांची कामे अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:22 AM2017-08-28T00:22:03+5:302017-08-28T00:22:10+5:30

गेल्या दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील उपनगरांमध्ये अद्यापही गणेशमूर्तींच्या सजावटीचे काम पूर्ण झालेले नाही. तथापि, बहुतांशी मोठ्या मंडळांचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून, सोमवारी देखावे खुले होण्याची शक्यता आहे.

Due to rain, the works of art are partially | पावसामुळे देखाव्यांची कामे अर्धवट

पावसामुळे देखाव्यांची कामे अर्धवट

Next

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील उपनगरांमध्ये अद्यापही गणेशमूर्तींच्या सजावटीचे काम पूर्ण झालेले नाही. तथापि, बहुतांशी मोठ्या मंडळांचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून, सोमवारी देखावे खुले होण्याची शक्यता आहे. गेल्याच वर्षी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकांमुळे यंदा राजकीय मंडळांची संख्या मुळातच कमी आहे. त्यातच यंदा गणेशोत्सवावर अनेक निर्बंध असल्याने त्याचा परिणाम गणेश मंडळांच्या उत्साहावर झालेला आहे. लहान किंवा पारंपरिक मंडळे सोडली तर यंदा नवीन मंडळांची भर पडलेली नाही. त्यातच गणेश चतुर्थीच्या अगोदरच्या दिवसांपासून सुरू असलेला पाऊस रविवारीही कायम असल्याने सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड या भागांत देखावे पूर्ण झालेले नाहीत. नाशिकरोड विभागातील गणेश मंडळांची संख्या सातत्याने कमी होत असून, पूर्वी ७० ते ८० अशी संख्या असताना आता मात्र मंडळे आठ ते दहा मोठी सार्वजनिक मंडळे शिल्लक राहिली आहेत. त्या तुलतेन विविध सोसायट्या आणि कॉलनी क्षेत्रांतील छोट्या मंडळांची संख्याच जास्त असल्याचे दिसते. छोट्या मंडळांच्या देखाव्याचे काम पूर्ण झाले असले तरी मोठ्या मंडळाचे काम अद्याप पूर्ण नाही. पावसाने उसंत घेतल्यास सोमवारी किंवा मंगळवारी देखावे पूर्ण होतील.
पंचवटीत अद्याप काम सुरू
पंचवटीत मंडळाचे देखावे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. या विभागात ७० हून अधिक सार्वजनिक मंडळे असून, काही ठिकाणी देखावे पूर्ण झाले नाही. रविवारचा दिवस असतानाही पंचवटी परिसरात देखावे पाहण्यासाठी यामुळेच गर्दी नव्हती. इतकेच नव्हे तर मंडळांकडून आयोजित विविध गुणदर्शनाच्या स्पर्धांनाही पावसामुळे प्रतिसाद लाभलेला नाही. सांस्कृतिक व मनोरंजनाचे खेळ आयोजित करणाºया मंडळांनी आता मंगळवारनंतरच असे उपक्रम घेण्याचे नियोजन केले आहे
सिडको भागात पावसामुळे अडथळा
सिडको भागात लहान-मोठी सुमारे शंभर मंडळे आहेत त्यापैकी बºयापैकी मोठ्या आणि लक्ष्यवेधी असलेल्या मंडळांचे ६० टक्के देखावे पूर्ण झाले आहेत. रविवारी पावसाने उसंत न दिल्याने देखाव्यांचे काम करण्यात येत अडथळे येत होते. सायंकाळी पाऊस थांबल्यानंतर सिडकोच्या काही भागांत मात्र नागरिक देखावे बघण्यासाठी बाहेर पडले होते. पाथर्डी परिसरात मोजकीच मंडळे असून, सोसायटी परिसरात मात्र मंडळांची संख्या अधिक आहे.

Web Title: Due to rain, the works of art are partially

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.