न्यायडोंगरी परिसरात पावसामुळे पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 02:44 PM2019-07-31T14:44:29+5:302019-07-31T14:45:00+5:30

न्यायडोंगरी: हवामान खात्याचा अतिवृष्टी होण्याचा ईशारा न्यायडोंगरी परिसरात का खरा ठरत नाही . पावसाळ्याचे निम्मे दिवस उलटून गेले तरी न्यायडोंगरी च्या एम.आय. टँक मध्ये साधे जनावरांना पाणी पिण्यासाठी डबके ही तुंबले नाही .

 Due to the rains in the Nyayadongri area, the life of the crop is dry but the dam is dry | न्यायडोंगरी परिसरात पावसामुळे पिकांना जीवदान

न्यायडोंगरी परिसरात पावसामुळे पिकांना जीवदान

Next
ठळक मुद्देन्यायडोंगरी परिसरात माणिकपुंज धरण , हातगाव धरण , न्यायडोंगरी एम.आय.टँक सह परिसरातील छोटे बंधारे पण कोरडे ठाक आहेत. जिल्यातील अनेक नद्यांना महापूर दिसत असताना आपली नदी कोरडी असल्याचं चिंता या परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे .


न्यायडोंगरी: हवामान खात्याचा अतिवृष्टी होण्याचा ईशारा न्यायडोंगरी परिसरात का खरा ठरत नाही . पावसाळ्याचे निम्मे दिवस उलटून गेले तरी न्यायडोंगरी च्या एम.आय. टँक मध्ये साधे जनावरांना पाणी पिण्यासाठी डबके ही तुंबले नाही . गेल्या आठवड्या पासून रिमझिम पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले खरे पण पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही गंभीरच दिसत आहे. देवा एकदा तरी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरू दे ! आमच्या धरणांमध्ये पाणी येऊन नद्यांना पूर येऊ दे!
अशी चर्चा परिसरातील शेतकº्यांमध्ये होत असून पावसासाठी प्रार्थना केली जात आहे.
संपुर्ण देशातील काही राज्यात पावसाने थैमान घातले असतांना तसेच राज्यातील काही जिल्ह्यामंध्ये ही भयानक पावसामुळे नद्यांची पूरिस्थती ओसरत नाही , तर नाशिक जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसात ५६१ मी.मि. ची नोंद झाली.अन त्याच जिल्यातील शेवटच्या टोकाला असलेलं न्यायडोंगरी मध्ये पावसाळ्याचे निम्मे दिवस दिवस उलटून गेले तरी येथील धरणांमध्ये जनावरांना पिण्यापूरते पाणी सुध्दा येत नाही अशीं स्थिती झाली आहे.
दररोज देशाच्या सर्व भागातून नदीला पूर तर काही गावांचा संपर्क तुटला आशा बातम्या ऐकण्यास मिळत असतांना च या भागात रिमझिम पावसावरच समाधान मानावे लागत आहे.

सोबत फोटो : न्यायडोंगरी एम.आय. टँक मध्ये जनावरांना पाणी पिण्यासाठी डबके ही भरलेली नाहीत.(31न्यायडोंगरी रेन)

Web Title:  Due to the rains in the Nyayadongri area, the life of the crop is dry but the dam is dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.