पावसामुळे रस्त्यावर रेती कच पडूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 01:13 AM2019-08-19T01:13:58+5:302019-08-19T01:14:17+5:30
पावसामुळे परिसरातील अनेक ठिकाणच्या मुख्य रस्त्यावरची बारीक खडी कच उघडली गेल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली होती. मात्र सध्या रस्त्यावर पडून असलेली हीच कच खडी अपघाताला निमंत्रण देत आहे.
पंचवटी : पावसामुळे परिसरातील अनेक ठिकाणच्या मुख्य रस्त्यावरची बारीक खडी कच उघडली गेल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली होती. मात्र सध्या रस्त्यावर पडून असलेली हीच कच खडी अपघाताला निमंत्रण देत आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने रस्त्यावर पडून असलेली बारीक कच उचलून घेणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याने दुचाकी वाहनधारक कच पडलेल्या रस्त्यावरून वाहने घसरून अपघात ग्रस्त होत आहे.
पावसामुळे परिसरातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांना खड्डे पडलेले होते त्यानंतर महापालिका प्रशासनाने काही ठिकाणच्या खड्ड्यात बारीक कच माती टाकून बुजविले असल्याचा दावा केला आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने खड्ड्यातील माती, कच उखडली गेली आहे. रस्त्यावरची रेती स्वच्छ न केल्याने दुचाकी वाहनधारकांना वाहने नेताना जरा जपूनच न्यावी लागत आहे बहुतांश रस्त्यावर बारीक रेती कच पडलेली असल्याने त्यावरून दुचाकी वाहने घसरत आहे. काही रस्त्यावर पडलेल्या कचवर दुचाकीस्वार घसरल्याने ते रस्त्यावर पडून किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.