मुकणे धरणातून पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:48 PM2019-04-02T12:48:59+5:302019-04-02T12:49:09+5:30
नांदूरवैद्य : मुकणे धरणातून दारणा दोहापर्यंत पाणी सोडण्यात आल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी सुखावले आहे. मुकणे धरणाच्या लाभक्षेत्रातील ओंड ओहोळ नदी गेल्या पंधरा दिवसापासून कोरडी ठाक पडली होती.
नांदूरवैद्य : मुकणे धरणातून दारणा दोहापर्यंत पाणी सोडण्यात आल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी सुखावले आहे. मुकणे धरणाच्या लाभक्षेत्रातील ओंड ओहोळ नदी गेल्या पंधरा दिवसापासून कोरडी ठाक पडली होती. शेतकऱ्यांची बागायती पिके वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे सुकत चालली होती तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला होता. मूळचे शेतकरी असलेले कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पागेरे यांनी पंचक्र ोशीतील शेतकऱ्यांच्या व्यथा नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पाअंतर्गत असलेल्या पाटबंधारे विभागाचे उपअभियंता शिंदे यांच्याशी व्यक्त करु न निवेदन देवून पाणी सोडण्याची विनंती केली. पाणी परवानगी घेतलेल्या लाभक्षेत्रातील सर्व गावांच्या शेतकºयांनी अधिकृत पाणी पट्ट्या भरु न दिल्यानंतर तात्काळ पाणी सोडणार असल्याचे अश्वासन शिंदे यांनी दिल्यानंतर दोन दिवसात गोंदे दुमाला,पाडळी, जानोरी, कुºहेगाव,बेलगाव कुºहे, नांदुरवैद्य आदी गावाच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांनी सन २०१८-१९ वर्षाच्या पाणी पट्ट्या तात्काळ भरु न दिल्यामुळे काल रात्री उशिरापर्यंत पाटबंधारे विभागाने दारणा दोहा पर्यंत पाणी सोडले आहे.
----------------
उन्हाच्या वाढत्या तापमानामूळे बागायती पिकांसाठी तसेच जनावरांसाठी पाणी अत्यावश्यक असल्याने मुकणे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांसाठी आरक्षित असलेले १२५ दशलक्ष घनफूट पाण्याच्या साठ्यातील हे दुसरे आवर्तन आम्ही हक्काने विनंती करु न पाटबंधारे विभागाने सोडले आहे.
- दशरथ पागेरे, अध्यक्ष, शेतकरी कृती समिती, इगतपुरी