पावसाअभावी पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 01:03 PM2018-10-05T13:03:18+5:302018-10-05T13:03:29+5:30
ओतूर : कळवण तालुक्यातील ओतुर परिसरात तब्बल एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
ओतूर : कळवण तालुक्यातील ओतुर परिसरात तब्बल एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्तर नक्षत्रा पाठोपाठ हत्ती नक्षत्र ही कोरडे जात आहे. त्यामुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, भात, कडधान्ये वाळली आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ओतूर धरणाचे पाणी कमी झाले आहे व पाझर तलाव आटला आहे. त्यामुळे मार्कंडेय नदीत कमी पाणी वहात आहे. ज्या शेतकºयांकडे पाणी आहे ते विहीरीवरु न पाणी भरून आपली पिके वाचवण्यासाठी आटापिटा करीत आहेत. येत्या चार दिवसात पाऊस आला नाही तर परिसरातील खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.