आवर्तनामुळे नामपूरचा पाणी प्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 06:40 PM2019-05-13T18:40:58+5:302019-05-13T18:41:30+5:30
नामपूर : शहर भयावह पाणीटंचाईस तोंड देत असतांनांच नामपूरला दिड कोट रु पये किमतीची केटीवेअर योजना मंजूर झाली. या ...
नामपूर : शहर भयावह पाणीटंचाईस तोंड देत असतांनांच नामपूरला दिड कोट रु पये किमतीची केटीवेअर योजना मंजूर झाली. या योजनेचे कामही पूर्ण झाले आहे. मोसम नदीचे या वर्षाचे शेवटचे आवर्तन सुटले. या केटीवेअरमध्ये पाणी आल्यावर नामपूरचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. मात्र या केटीवेअर जवळ सधनलोक जमीनी घेऊन येथून पाणी इतरत्र नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे झाल्यास मुळ हेतुस बगल बसून या योजनेचा हेतू सफल होणार नाही. म्हणून या ठिकाणी जमिन खरेदी-विक्र ीस एका विशेष ग्रामसभेत ठराव करावा. असे आवाहन नामपूरचे सामाजिक कार्यकर्तेे दिपक, महेश आणि प्रमोद सावंत यांनी केले आहे.
नामपूर गेल्या पंधरा ते विस वर्षापासून प्रचंड पाणी टंचाईस सामोरे जात आहे. पंधरा दिवस तिन आठवडे किंवा एक महिना अशा फरकाने पाणी योजनेस गावास पाणीपुरवठा होतो. तोही अत्यल्प व कमीदाबाने, त्यामुळे गृहिणींची पाण्यासाठी एकच धावपळ होते. विशेष म्हणजे समृद्ध पाण्याच्या गावात आज पाणी विकत घेऊन पाणीप्रश्न सोडवावा लागतो.
नामपूरचा पाणी प्रश्न सुटावा म्हणुन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक प्रयत्न झालेत. अनेक विहीरी खोदल्यात. अनेक दानशूरांनी गावांस मोफत पाणीही दिले. मात्र पाणीप्रश्न जैसे थे होता. युतीशासन व मायलॉन कंपनीकडून मोठा निधी मिळाला. व केटिवेअरची जुनी मागणी पुर्ण झाली. आज केटिवेअर पुर्ण झाले असून या आठवड्यातच नामपूरचा पाणीप्रश्न सुटणार आहे.
केटीवेअरमध्ये पाणीसाठा झाल्यास याचे बॅकवॉटर मोठ्या बंधाऱ्यापर्यंत जाईल. व मुबलाक पाणीसाठा उपलब्ध होईल. आणि गावाचा पाणीप्रश्न सुटेल. मात्र या ठिकाणी जर जागा खरेदी-विक्र ीचे व्यवहार झालेत तर येथे अनेक विहिरी होतील व येथून शेतीव्यवसायाला इतरत्र पाणी निघून जाईल, व नामपूरचा पाणी प्रश्न दिड कोट खर्चूनही पुन्हा जैसे थे राहील. यासाठी ग्रामपंचायतीन एक विशेष ग्रामसभा बोलवावी व केटीवेअर ते ब्रिटिशकालिन बंधाºर्यापर्यत जागा खरेदी-विक्र ीवर निर्बंध आणावेत. अशी मागणी सावंत यांनी केली आहे.