दुखवटा म्हणून कपड्यांऐवजी पुस्तकांचे दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 01:23 PM2018-05-23T13:23:32+5:302018-05-23T13:23:32+5:30

पेठ/रामदास शिंदे - मृत्यूनंतर विविध कर्मकांड व दुखवटा म्हणून कपडे देणे ही प्रथा आहे.पण ही परंपरा मोडीत काढून कपड्यांऐवजी पुस्तके द्या,असे आवाहन सोशल मिडियावरून केलेल्या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसादही मिळाला अन् गरीब विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून पुस्तकांची मदतही देण्यात आली.

 Due to sadness, donation of books rather than clothes | दुखवटा म्हणून कपड्यांऐवजी पुस्तकांचे दान

दुखवटा म्हणून कपड्यांऐवजी पुस्तकांचे दान

googlenewsNext

पेठ/रामदास शिंदे - मृत्यूनंतर विविध कर्मकांड व दुखवटा म्हणून कपडे देणे ही प्रथा आहे.पण ही परंपरा मोडीत काढून कपड्यांऐवजी पुस्तके द्या,असे आवाहन सोशल मिडियावरून केलेल्या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसादही मिळाला अन् गरीब विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून पुस्तकांची मदतही देण्यात आली. प्रमोद आहिरे हे पेठ तालुक्यातील जि.प.शाळा बोरवट येथे प्राथमिक शिक्षक आहेत.आई लिलावती अहिरे यांच्या निधनानंतर पुण्यानुमोदनचा कार्यक्र म त्यांनी वेगळ्या पद्धतीने घेण्याचे ठरविले. सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी सर्व मित्र व नातेवाईकांना संदेश पाठविला.त्यात म्हटले की, दुखवटा म्हणून कपडे, साडी, शाल, टोपी, टॉवेल यांचा फारसा उपयोग होत नसल्याने सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, ललित, सामान्यज्ञानाची पुस्तके द्यावीत.ही पुस्तके उपक्र मशील वाचनालयाला भेट देऊ या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जवळपास १२ हजार ६३५ रु पयांची १३५ पुस्तके मिळाली. अनेक नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तेष्ट यांनी आहिरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुस्तके दान केली. त्यात अहिरे यांनी स्वत: एकहजार पाचशे रु पयांच्या पंचवीस पुस्तकांची भर घातली.ही पुस्तके दिंडोरी तालुक्यातील उपक्र मशील वाचनालय पिंपळपाडा व गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बोरगड येथील संत गाडगेबाबा अभ्यासिकेला विभागून देण्यात आली.विचारांचा चिरंतन जागर तेथे होत राहील,अशी त्यामागची त्यांची भूमिका आहे. थोडं वेगळं जगूया.थोडं चांगलं करु या.विचाराच्या दिशेने प्रत्येक पाऊल टाकूया. अशी सुरु वात असणाऱ्या संदेशाला भरभरु न प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title:  Due to sadness, donation of books rather than clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक