पडूनपदे मंजूर झाल्याने आरोग्य केंद्रे सुरू होण्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:50 AM2018-02-20T00:50:49+5:302018-02-20T00:52:37+5:30
नाशिक : गेल्या काही वर्षांपासून इमारत बांधून निव्वळ कर्मचाºयांअभावी धूळ खात पडून असलेल्या येवला तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचा आकृतिबंध मंजूर केल्यामुळे राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रासह निमगावमढ, एरंडगाव व देवठाण ही उपकेंद्रे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिक : गेल्या काही वर्षांपासून इमारत बांधून निव्वळ कर्मचाºयांअभावी धूळ खात पडून असलेल्या येवला तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचा आकृतिबंध मंजूर केल्यामुळे राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रासह निमगावमढ, एरंडगाव व देवठाण ही उपकेंद्रे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील निमगावमढ, एरंडगाव व देवठाण येथे उपकेंद्रांच्या इमारती बांधून पूर्ण झालेल्या होत्या. मात्र या आरोग्य संस्थेकरिता आरोग्य कर्मचाºयांच्या पदांचा आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित होता. त्यामुळे इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊनही या आरोग्य संस्था कार्यान्वित झालेल्या नव्हत्या. पदांचा आकृतिबंध शासनाने मंजूर न केल्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या सुसज्ज इमारती गेल्या अनेक वर्षांपासून विनावापर पडून होत्या.
यासाठी छगन भुजबळ यांनी अनेकदा लेखीपत्र देऊन पदांचा आकृतिबंध मंजुरीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्र हे स्थलांतरित प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे ते ग्रामपंचायतीने दिलेल्या तात्पुरत्या जागेत सुरू होते.
भुजबळ यांनी प्रयत्न करून त्यासाठी नवीन इमारत मंजूर करून घेतली व या इमारतीचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. या इमारतीचे काम पूर्ण झाल्यावर सध्या ग्रामपंचायतीच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात सुरू असलेले आरोग्य केंद्र हे नवीन इमारतीत कार्यान्वित होणार आहे. शासनाने राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता दोन वैद्यकीय अधिकारी, दोन आरोग्यसहायक, परिचारिका यांच्यासह नऊ तांत्रिक, तर एक अतांत्रिक याप्रमाणे १५ पदांना मंजुरी दिली आहे.
लवकरच या संस्थांचे लोकार्पण
निमगावमढ, एरंडगाव व देवठाण या उपकेंद्राकरिता प्रत्येकी एक स्त्री व पुरुष आरोग्य कर्मचारी आणि अंशकालीन स्त्री परिचर अशा एकूण प्रत्येकी तीन पदांना मंजुरी दिली आहे.
राजापूर, निमगावमढ, एरंडगाव व देवठाण येथील आरोग्य संस्थाच्या इमारतींचे उद््घाटन करून या संस्था कार्यान्वित करण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे लवकरच या संस्थांचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे भुजबळ यांचे स्वीय सचिव बाळासाहेब लोखंडे यांनी सांगितले.