वाळू उपशामुळे पूल बनला धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 02:25 PM2019-03-27T14:25:31+5:302019-03-27T14:26:13+5:30
नामपूर/शरद नेरकर : नामपूर येथील मोसम नदी पात्रात गेल्या अनेक वर्षापासून सर्रासपणे वाळू उपसा होत आहे.
नामपूर/शरद नेरकर : नामपूर येथील मोसम नदी पात्रात गेल्या अनेक वर्षापासून सर्रासपणे वाळू उपसा होत आहे. वाळू चोरटे दिवसाढवळ्या वाळू उपसा करीत असल्यामुळे मोसम नदीवर नामपूर-साक्र ी रस्त्यावर १९७३ सालात उभारण्यात आलेल्या पूलाचा पाया उघडा पडला असल्यामुळे कधीही पूल कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून एकेकाळचे पाण्यासाठीचे सुखसमृध्द नामपूर गाव आता भग्नतेकडे वाटचाल करीत असून गावात पाणीबाणी निर्माण झाली आहे, महिन्यातून दोनदा नळांना पाणी येते. आजूबाजूला शेतविहीरी आटल्या आहेत.पाणबिाणी ही फक्त वाळूउपशामुळेच निर्माण झाली आहे. ग्रामसभेत वाळूउपशावर बंदीचा ठराव झालेला असतांना खुलेआम वाळू वाहतूक सुरु आहे. येथील मोसम नदी पात्रातून ब्रिटिशकालिन मोठा बंधारा ते नकट्या बंधारा येथून वाळू माफियांकडून वाळू बंदी असताना देखील गाढवावरून वाळू उपसा होत असल्याने नैसर्गिक संपत्तीचा दिवसेंदिवस ºहास होत असल्याने नदीपात्रात वाळू शिल्लक राहिली नाही. या ठिकाणी फक्त दगड गोटे शिल्लक राहिले आहेत. यामुळे परिसरातील विहिरीनि तळ गाठला आहे. वाळू नसल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी जमिनीची पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे दरवर्षी नामपूरकरांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर परिस्थितीची प्रशासनाने दखल घ्यावी व वाळू चोरट्यांवर कारवाईची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पंचाळ,रविन्द्र देसले आदींनी केली आहे.