देवळा बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था

By admin | Published: July 15, 2017 01:00 AM2017-07-15T01:00:50+5:302017-07-15T01:01:02+5:30

देवळा : बसस्थानकावरील शौचालये नादुरु स्त झाल्याने त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या उपस्थितीत देवळा नगरपंचायत नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने केली आहे.

Due to the sanitary latrine in Deola bus station | देवळा बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था

देवळा बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळा : बसस्थानकावरील शौचालये नादुरु स्त झाल्याने त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या उपस्थितीत देवळा नगरपंचायत नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने नाशिक येथे राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रण अधिकारी यामिनी जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. देवळा शहर हे चौफुलीवर वसलेले तालुक्याचे गाव आहे. येथून राज्य व आंतरराज्य बसेसची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. देवळा बसस्थानकावर दिवसभरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ये - जा करतात. शौचालय नादुरुस्त असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. महीलावर्गाची मोठी कुचंबणा होत आहे. तसेच प्रवाशांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था परिवहन विभागाने केलेली नाही. शौचालयांची त्वरित दुरुस्ती करून नवीन शोषखड्डा तयार करावा, नदीपात्रात जाणारे सांडपाणी त्यात टाकावे व परिसराची स्वच्छता नियमतिपणे करावी. तसेच प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय परिवहन विभागाने करावी, अशी मागणी नगराध्यक्ष वृषाली अहेर, उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत अहेर, नगरसेवक अतुल पवार, बाळासाहेब अहेर आदी नगरसेवकांनी केली आहे. स्वच्छ व सुंदर देवळा ही संकल्पना साकार करण्यासाठी देवळा नगरपंचायतीने शहरात पेव्हर ब्लॉक, काँक्रीटीकरण आदी शहर सुशोभिकरणाची काही कामे पूर्ण केली आहेत. बसस्थानकाजवळ नदीकाठावर रस्ता संरक्षण भिंत बांधकाम सुरू आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. बसस्थानकावरील अस्वच्छता नदीपात्राच्या परिसराच्या सौंदर्यास तसेच आरोग्यासाठी बाधक ठरत आहे.
अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची भीती
देवळा बसस्थानकावरील स्वच्छतागृह व शौचालयांची अवस्था दयनीय झाली असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. यामुळे प्रवाशांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. शौचालयांचे बांधकाम जीर्ण झाले असून, शोषखड्डा पूर्णपणे भरला आहे. शोषखड्ड्यातील सांडपाणी कोलती नदीपात्रात येऊ लागल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. रविवारी भरणारा आठवडे बाजार या नदीपात्रात भरतो.  नदीपात्रालगतच देवळा शहराचे ग्रामदैवत दुर्गामातेचे मंदिर तसेच स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे. यामुळे येथे नेहमी भाविकांची वर्दळ असते. मंदिरात येणाऱ्या भाविकांना दुर्गंधी सहन करावी लागते. आठवडे बाजारात या सांडपाण्याशेजारीच खाद्य व फळविक्रेते आपली दुकाने लावतात. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Web Title: Due to the sanitary latrine in Deola bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.