शॉर्टसर्किटमुळे दीड एकर ऊस जळुन खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:32 PM2018-11-01T12:32:33+5:302018-11-01T12:32:41+5:30

सायखेडा : चाटोरी (ता. निफाड) येथे बुधवार सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतात असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे सुमारे दीड एकर ऊस जळुन खाक झाला आहे.

Due to short circuits, one half acres of sugarcane burns | शॉर्टसर्किटमुळे दीड एकर ऊस जळुन खाक

शॉर्टसर्किटमुळे दीड एकर ऊस जळुन खाक

Next

सायखेडा : चाटोरी (ता. निफाड) येथे बुधवार सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतात असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे सुमारे दीड एकर ऊस जळुन खाक झाला आहे. गोदावरी नदीच्या काठी चंद्रकांत रु ंजाजी घोलप (गट नं. ७०८), तसेच शरद छबु हांडगे, रावसाहेब वाळू हांडगे, दीपक संतू हांडगे यांचे (गट नं. ७०९) शेती क्षेत्र असुन, सकाळी ११ वाजेच्या सुमारास या ठिकाणी ऊसाने पेट घेतला. धुराचे लोळच्या लोळ उठत असल्याचे बघुन, आसपासच्या शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, तो पर्यंत सुमारे दीड एकर ऊस जळून खाक झाला होता. ग्रामस्थांनी प्रसंगावधानता दाखवल्याने आसपासचे सुमारे १००-१५० एकर ऊस क्षेत्र वाचविण्यात यश आले आहे. काही महिन्यांपूर्वी येथुन जवळच असलेल्या, ऊस क्षेत्रात झालेल्या शॉर्टिसर्कटमुळे मोठ्या प्रमाणात ऊस जळून खाक झाला होता.
---------------------
शॉर्टसर्किटमुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले. शेतकºयांना कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही, अन मिळाली तर ती देखील तुटपूंजी मिळते, त्यात भांडवलही वसूल होत नसल्याने रहिवासी, शेतकºयांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. विज वितरणने भरीव आर्थिक मदत द्यावी.
-नारायण घोलप, शेतकरी, चाटोरी.
 

Web Title: Due to short circuits, one half acres of sugarcane burns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक