अपुº्या सुविधांमुळे पेठला रु ग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 04:50 PM2019-06-14T16:50:10+5:302019-06-14T17:01:33+5:30
पेठ - जवळपास संपुर्ण तालुक्यातील रूग्ण ज्या ग्रामीण रु ग्णालयावर अवलंबून आहेत. त्या पेठच्या ग्रामीण रु ग्णालयातील विविध समस्या पाहून खा. भारती पवारही अंचबीत झाल्या. ग्रामस्थ व सामाजिक संस्थांनी केलेल्या तक्र ारीची दखल घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

येथील ग्रामीण रूग्णालयाला खा. पवार यांनी भेट देऊन सुविधांची पाहणी केली. वैद्यकिय आधिकारयांसह कर्मचार्यांची रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, रूग्णवाहिकांची दुरवस्था, भौतिक सुविधांचा अभाव, अस्वच्छता अशा विविध समस्यांनी ग्रासलेल्या रु ग्णालयाबाबत ग्रामस्थांनी खासदारांच्या समोर समस्यांचा पाढा वाचला. ग्रामस्थ व आखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सदस्यांनी खासदारांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
सद्या पावसाचे दिवस जवळ आल्यामुळे ग्रामीण भागात साथीचे आजार डोके वर काढत असतात. अतिदुर्गम गावात आरोग्याच्या सुविधा नसल्याने रु ग्णांना ग्रामीण रु ग्णालयावर अवलंबून रहावे लागते. अनेक वेळा पेठला आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याने गरीब रु ग्णांना खाजगी उपचार घ्यावे लागतात. रु ग्णवाहिका बंद असल्याने खाजगी वाहनाने नाशिक गाठावे लागते.