दुबार पेरणीचे संकट, पावसासाठी प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:19 AM2019-07-19T00:19:31+5:302019-07-19T00:20:31+5:30
देवळा/उमराणे : जिल्ह्याच्या बहुतांश भागात दुबार पेरणीचे संकट असून, पावसासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. मागील वर्षाच्या तीव्र दुष्काळानंतर चालू वर्षी जोरदार पावसाची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना या वर्षीही पावसाने ओढ दिल्याने अत्यल्प पावसावर केलेल्या पेरण्या पाण्याअभावी कोमजू लागल्या असून, मका पिकावर लष्करी अळीने अतिक्रमण केल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
देवळा/उमराणे : जिल्ह्याच्या बहुतांश भागात दुबार पेरणीचे संकट असून, पावसासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. मागील वर्षाच्या तीव्र दुष्काळानंतर चालू वर्षी जोरदार पावसाची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना या वर्षीही पावसाने ओढ दिल्याने अत्यल्प पावसावर केलेल्या पेरण्या पाण्याअभावी कोमजू लागल्या असून, मका पिकावर लष्करी अळीने अतिक्रमण केल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
मागील वर्षी अत्यल्प पावसामुळे खरीप, रब्बी असे दोन्ही हंगाम वाया गेले होते. परिणामी उत्पन्न तर दूरच; परंतु संपूर्ण वर्षभर पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चारा पुरविण्यासाठी या भागातील नागरिकांना जिकिरीचे बनले होते. त्यामुळे या वर्षी चांगला पाऊस पडेल व मागील दुष्काळाची तुट भरून निघेल या अपेक्षेपोटी शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसतानाही आगामी उत्पादनाच्या भरवशावर खासगी कर्ज घेत कंबर कसली होती. सर्वत्र पाऊस सुरू झाल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पाहिजे त्या प्रमाणात जोरदार पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबतील या भीतीपोटी आलेल्या रिपरिप पावसावर कमीअधिक ओलीवर या भागातील शेतकºयांनी मका, बाजरी, तूर, भुईमूग, कपासी, मूग आदींचे महागडे बियाणे खरेदी करून पेरण्या केल्या. परंतु पेरणी केल्यानंतर पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पिके कोमजू लागली आहेत. लष्करी अळींचा प्रादुर्भाव; उपाययोजनेची मागणीदुष्काळात तेरावा महिना म्हणून चालूवर्षी मका पिकावर लष्करी अळींचा प्रादुर्भाव वाढल्याने महागड्या औषधाची फवारणी करण्याची वेळ आल्याने अस्मानी सुलतानी संकटांनी बेजार झालेल्या शेतकºयांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. येत्या आठ दिवसात पाऊस न आल्यास पेरणीसाठी केलेला खर्च वाया जाणार असून, दुबार पेरणीचे संकट या भागातील शेतकºयांवर ओढावणार आहे. परिणामी अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाºया देवळा तालुक्याच्या पूर्व भागात सततच्या नापिकी व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरीवर्ग कर्जाच्या खाईत लोटला जात आहे.जायखेड्यात पावसासाठी नमाजपठणजायखेडा : परिसरात पावसाने दडी मारल्याने तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी व शेतमजूर मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतोपयोगी पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना सर्वांना करावा लागत आहे. यामुळे सर्वजण हवालदिल झाले आहेत. पाऊस पडावा यासाठी सर्वत्र होमहवन दुवा पठण करून वरूणराजाला साकडे घातले जात आहे. याच पार्श्वभूमीवर जायखेडा येथील मुस्लीम बांधवांकडून गेल्या तीन दिवसांपासून येथील इदगाहजवळ नमाजपठण करून पावसासाठी दुवा मागितली जात आहे. मौलाना हफीज सलीम, नशिरखा पठाण, नईम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो मुस्लीम बांधव नमाजपठणात सहभागी होत आहेत. पाऊस न झाल्याने सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पिके वाया गेली असून, विहिरींना पाणी नसल्याने मानवासह जनावरांचे हाल होत आहेत. अशा बिकट स्थितीचा सामना करणाºया मानवजातीसह भूतलावरील जीवजंतूंच्या रक्षणासाठी सर्वत्र पाऊस पडू दे, सर्वांना सुखी ठेव, अशी मागणी नमाजपठाणातून करीत आहे.
लष्करी अळीबाबत जनजागृती मोहीम
निफाड : तालुका कृषी विभागाच्या वतीने मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी निफाड तालुक्यातील बेहेड येथे शेतकºयांसाठी मार्गदर्शन
शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन शिबिरात मंडळ कृषी अधिकारी वरुण पाटील यांनी मका पिकांची पेरणीपूर्वी बीजप्रक्रि या करण्यासाठी थायोमेथोक्झाम व सायएन्ट्रीनिलीपोल ही संयुक्त कीटकनाशके चार मिली प्रति एक किलो बियाणेसाठी वापरून पेरणी करावी, असे सांगितले.