साठवण तलावाचा पाणीसाठा संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:20 AM2019-05-31T00:20:00+5:302019-05-31T00:23:27+5:30
येवला : शहराला पाणीपुरवठा करणारा ५० दलघफू क्षमतेच्या साठवण तलावाचा तळ उघडा पडला आहे. गंगासागर तलावातील पाण्याची मोजणीदेखील करता येण्याची स्थिती राहिलेली नसल्याने आता शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. शहराला सात दिवसांआड मिळणारे हे अखेरचे पाणी असणार आहे.
येवला : शहराला पाणीपुरवठा करणारा ५० दलघफू क्षमतेच्या साठवण तलावाचा तळ उघडा पडला आहे. गंगासागर तलावातील पाण्याची मोजणीदेखील करता येण्याची स्थिती राहिलेली नसल्याने आता शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. शहराला सात दिवसांआड मिळणारे हे अखेरचे पाणी असणार आहे. पालिका आता शहराला केवळ एकदाच पाणी पुरवू शकेल, अशी स्थिती आहे.
चार महिन्यांपासून येवला शहरवासीय अगदी काटकसरीने पाणी वापरत आहेत. अंतिम टप्प्यातदेखील आवर्तन येईपर्यत शहरवासीयांना पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे तालुक्यासह शहरात पिण्याच्या पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून यापुढेही अजून भयावह चित्र होण्याची भीती व्यक्त होत आहे. साठवण तलावाभोवती असलेल्या असंख्य विहिरींमधील होणारा दररोजचा पाणी उपसा तसेच वाढत्या उष्णतेमुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन, जमिनीतील पाण्याचा झिरपा यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगासागर तलावातील पाणी संपले असून शहरात केवळ एक वेळ पाण्याचा पुरवठा होऊ शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर मात्र शहरवासीयांना पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. शहरात आज पाण्याची तीव्रटंचाई निर्माण झाली असून, नागरिक पाण्यासाठी भटकताना दिसत आहेत. पालखेडचे पुढील आवर्तन जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असल्याची माहिती आहे. आवर्तन सुटल्यानंतरही ९० किलोमीटरपर्यंत चारीलगत असलेले शेकडो डोंगळे यातून होणारी पाणीचोरी व त्यामुळे कमी दाबाने पाणी येवल्यात पोहचते. साठवण तलाव भरून देण्याची पालखेडच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी असतानाही पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे मुख्याधिकारींसह पालिका कर्मचाºयांना पाण्यासाठी रात्रीची गस्त घालावी लागते. शहरात नळांना पाणी आल्यानंतर पाण्याची नासाडी होणार नाही याबाबत साठवण तलावात अल्प पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला पिण्यासाठी रोज ५० लाख लिटर पाणी लागते. साठवण तलावातील पाणी पुढील आवर्तन येईपर्यंत पुरवावे लागणार आहे. पाणी जपून वापरावे. नागरिकांनी जागरूकता दाखविणे गरजेचे आहे.
-संगीता नांदुरकर, मुख्याधिकारी, येवला नगर परिषद