अचानक प्रकृती खालावल्याने 74 विद्यार्थी जिल्हा रुग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 03:03 PM2019-08-29T15:03:19+5:302019-08-29T15:10:43+5:30
नाशिक शहरातील बोरगड परिसरात न्यू ग्रेस अकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत अचानक सुमारे 74 विद्यार्थ्यांना खाज, उलटी आणि मळमळ होऊ लागल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या संशयातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिक : शहरातील बोरगड परिसरात न्यू ग्रेस अकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत अचानक सुमारे 74 विद्यार्थ्यांना खाज, उलटी आणि मळमळ होऊ लागल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या संशयातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भाजपाच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रोहीनी नायडू यांच्या स्वंयअर्थ सहाय्यित न्यू ग्रेस अकॅडमी या शाळेत गुरुवारी (दि.29) सकाळी साडदहा ते अकरावाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून एकामागून एक विद्यार्थी खाज येत अशल्याची तक्रार करून लागल्याने शाळा प्रशासनाने तत्काळ सर्व विद्यार्थ्यांना जिल्हारुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. शाळेतील शिक्षकांनी घडलेल्या प्रकाराविषयी दिलेल्या माहिती देताना सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचे जेवन झाल्यानंतर हात धुत असताना हा प्रकार घडला आहे. शाळेत येणारे सर्व विद्यार्थी घरुनच त्यांचा जेवनाचा डबा घेऊन येत असल्याने अन्नातून विषबाधा होण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नसस्याचे काहींनी सांगितले. तर काही कर्मचाऱ्यांनी परिसरातील विषारी किटक चावल्यामुळे असा प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र अचानक शाळेतील 74 विद्यार्थ्याची प्रकृती बिघाडल्याने शाळाप्रशानाच्या कार्यपद्धतीविषयी शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. दरम्यान, जिल्हा रुग्णलायातील डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना विषारी किटक चावल्यामुळे अशा प्रकारचा त्रास उद्भवल्याचा संशय व्यक्त करताना रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांपैकी दहाजणांना उलटटी आणि मळमळसोबत चक्कर येण्याचा त्रास होत असून अन्य विद्यार्थ्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती दिली आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉ. विठ्ठल काळे, डॉ.डी.बी जगताप आणि डॉ. स्वप्नील जैन यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व रुग्णांची तत्काळ तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले. यावेळी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसह परिचारीकांनीही अतीशय जलदगतीने विद्यार्थ्यांवरील औषधोपचारासाठी मदत केल्याचेही यावेळी दिसून आले.