शिक्षकांच्या उदासीनतेमुळे नीतिमूल्यांचे तास घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:16 AM2018-09-17T00:16:05+5:302018-09-17T00:16:24+5:30

सद्यस्थितीत शालेय शिक्षण देणारे शिक्षक घड्याळानुसार चालतात. परीक्षेच्या नियोजित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निरसन  करण्याचा वेळ शिक्षकांकडे नसतो.

 Due to the teacher's depression, it is time to take the hours of ethics | शिक्षकांच्या उदासीनतेमुळे नीतिमूल्यांचे तास घेण्याची वेळ

शिक्षकांच्या उदासीनतेमुळे नीतिमूल्यांचे तास घेण्याची वेळ

Next

नाशिक : सद्यस्थितीत शालेय शिक्षण देणारे शिक्षक घड्याळानुसार चालतात. परीक्षेच्या नियोजित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निरसन  करण्याचा वेळ शिक्षकांकडे नसतो. अशा घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या शिक्षकांमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये नीतिमूल्यांच्या अभाव जाणवून लागल्याने शालेय वेळापत्रकातच नीतिमूल्यांचे तास घेण्याची वेळ आल्याची खंत सुभाष गुळेचा यांनी व्यक्त केली आहे.  जैन सोशल ग्रुप सेंट्रलतर्फे रविवारी चोपडा हॉलमध्ये रविवारी (दि.१६)शिक्षण क्षेत्रातील उल्लेखणीय योगदानासाठी सुभाष गुळेचा यांना महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या हस्ते कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सत्कार सोहळ््यास उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी ग्रुप सभासदांच्या पहिली ते उच्चशिक्षित गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार व गुणगौरव करण्यात आला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सचिन शाह, श्रेयांश शाह, राजेंद्र संचेती यांच्यासह जैन सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुभाष भंडारी, अध्यक्ष अजय मंचरकर, सचिव शुभदा बोरा, शारदा भंडारी, चंद्रकांत पारख आदी उपस्थित होते. गुळेचा यांनी शालेय शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिस्त लावतानातच प्रामाणिकपणे व सचोटीने ज्ञानदानाचे काम करीत देशाच्या भावी पिढीमध्ये नीतिमूल्य रुजविण्याचे आवाहन केले, तर संतोष मंडलेचा यांनी विद्यार्थ्यांनी धेय्य निश्चित करून ते प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

Web Title:  Due to the teacher's depression, it is time to take the hours of ethics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.