दाट धुक्यामुळे बळीराजांवर अस्मानी संकटाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 09:21 PM2020-12-20T21:21:05+5:302020-12-21T00:02:27+5:30

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या संध्याकाळ पासुन ते दहा वाजेपर्यंत पाणी मिश्रित दाट धुके पडत असल्यामुळे बळीराजांवर पुन्हा अस्मानी संकटाचा घाला निर्माण झाल्याने बळीराजांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Due to the thick fog, a catastrophic disaster befell Baliraja | दाट धुक्यामुळे बळीराजांवर अस्मानी संकटाचा घाला

दाट धुक्यामुळे बळीराजांवर अस्मानी संकटाचा घाला

Next
ठळक मुद्देबळीराजांची चिंता वाढली : दिंडोरी तालुक्याला माथेरानचे स्वरूप

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या संध्याकाळ पासुन ते दहा वाजेपर्यंत पाणी मिश्रित दाट धुके पडत असल्यामुळे बळीराजांवर पुन्हा अस्मानी संकटाचा घाला निर्माण झाल्याने बळीराजांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासुन दाट धुके पडत असल्याने रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. सध्या थंडीचे प्रमाण कमी व पाणी मिश्रित दाट धुके हे रब्बी हंगामातील नवीन समीकरण तयार झाल्याने पिके कशी वाचवयचे ही समस्या आ वासुन उभी राहिली आहे.
२०१४-१५ या वर्षी अशाच स्वरूपाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या ही वेळेस रब्बी हंगामाच होता. तेव्हा गहु, हरभरा, ऊस, कांदा व इतर नगदी पिके पुर्णपणे नष्ट झाली होती.त्यामुळे बळीराजांवर आर्थिक संकट कोसळले होते. दिवसेंदिवस वातावरणातील बदल हा शेतकरी वर्गाच्या प्रगतीला खिळ घालत असल्यामुळे शेती करणे शेतकरी वर्गाला एक प्रकारे आवाहन ठरत आहे. वातावरणातील बदल जर असाच होत राहिला तर बळीराजां कर्जाच्या डोंगरांला बाहेर पडू शकत नाही. असे विचार सध्या जाणकार शेतकरी वर्गातुन व्यक्त केले जात आहे.

रब्बी हंगामाच्या सुरुवातील पोषक वातावरण होते. परंतु नंतर मात्र पेरण्या संपल्यानंतर व उगवण प्रक्रिया मध्यांवर आल्यानंतर रब्बी हंगामातील पिकांवर वातावरणातील बदलावाचे गडद अस्मानी संकट निर्माण झाल्याने मेटाकुटीला आलेला जगाचा पोशिंदा बळीराजां आता यामुळे चारी मुंड्या चित होतो कि काय ? अशी भीती दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाला वाटु लागली आहे.
खरीप हंगाम कोरोनामुळे व परतीच्या पावसाने वाया गेला. त्यामुळे जवळचे सर्वच भांडवल संपून गेलेले असतांना मिळेल त्या ठिकाणीहुन भांडवल उभे करत रब्बी हंगामावर अपेक्षा एकवटून कंबर खचलेल्या बळीराजाला बदलत्या वातावरणाचा व दव आणि दाट धुक्याचा परिणाम होऊ नये म्हणून दिवस रात्र एककरून रब्बी पिके वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे.
त्यात दिवसा वीज बंद व रात्री वीज चालू या धोरणामुळे शेतकरी वर्गाची डोके दुखी अजूनच वाढत आहे. सध्या दिंडोरी तालुक्यात बिबट्या वाघ व भुरट्या चोरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी वर्ग संकटांच्या दरीत सापडला आहे.

तालुक्यात सध्या दव आणि दाट धुके पडत असल्यामुळे त्यांचा परिणाम द्राक्षे, कांदा , टमाटा, ऊस व सर्व प्रकारचा भाजीपाला व इतर नगदी पिके यांच्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव रूपाने दिसत आहे. त्यात करपा, मिलीबग, चिकटा, डावणी, घडांना तडे जाणे, घडामध्ये पाणी थांबल्याने घड कुंजण्याचे प्रमाणात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाल्याने तसेच खर्च जास्त व उत्पन्न कवडी मोल हे उलटे समीकरण निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग पुर्णपणे हतबल झाला आहे.

बळीराजांला सध्या टमाटा पिकांने चांगली साथ दिली आहे. टमाट्यामुळे झालेले नुकसान भरून निघण्यासाठी थोड्या फार प्रमाणावर हात भार लागत असल्यामुळे शेतकरी वर्ग तग धरून आहे. पण आता या दाट धुके व वातावरणातील बदलाव यांचा नगदी भांडवल मिळुन देणाऱ्या टमाटा पिकांवर होत असल्यामुळे बळीराजांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. (२० लखमापूर)

Web Title: Due to the thick fog, a catastrophic disaster befell Baliraja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.