७२ तासाच्या मेगाब्लॉकमुळे मनमाड स्थानकात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 10:32 PM2022-02-05T22:32:05+5:302022-02-05T22:33:35+5:30
मनमाड : मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा दरम्यान नवीन रेल्वे मार्गासाठी ७२ तासाचा मेगाब्लॉक सुरू झाल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे भुसावळ विभागातून मुंबईकडे धावणाऱ्या डाऊन अशा १७ महत्त्वपूर्ण रेल्वे प्रवासी गाड्या दोन दिवस रद्द केल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. महत्त्वाच्या गाड्या रद्द झाल्यामुळे मनमाड रेल्वे स्थानकात शनिवारी शुकशुकाट दिसून आला.

मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकावर नवीन रेल्वेमार्गाच्या कामासाठी ७२ तासाचा मेगाब्लॉक सुरू झाल्यामुळे भुसावळ विभागातील मनमाड मार्गे धावणाऱ्या १७ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, मुंबई-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस दोन्ही बाजूंनी, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस या सर्व गाड्या ५ व ६ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.