नायगाव खोºयात पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 11:41 PM2017-09-07T23:41:29+5:302017-09-08T00:11:37+5:30

सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयात विविध पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतातच पिके खराब झाल्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.

Due to various diseases of crops in Naigaon lost season | नायगाव खोºयात पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

नायगाव खोºयात पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

googlenewsNext

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयात विविध पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतातच पिके खराब झाल्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.
सध्या नायगाव व परिसरात कोबी, टमाट्याचे मोठ्या प्रमाणात पीक असून, या पिकांना बाजारात चांगला भाव मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून या काढणीला आलेल्या कोबीवर करपा, काळे ठिपक्यांबरोबर दांड्या रोगाचा, तर टमाट्यावर काळा व पिवळा करपा व पान गळतीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यापासून या पिकांना महागडी खते, कीटकनाशके आदींसह विविध कामांवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. सध्या या पिकांना बाजारात योग्य भाव मिळत आहे. अशा परिस्थतीत शेतकºयांना चार पैसे मिळण्याची आशा असताना या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोबी, फ्लॉवर, टमाटे ही पिके सध्या शेतातच खराब होत असल्यामुळे शेतावर येणारे व्यापारी माल खरेदी करण्यास धजावत नाही. यामुळे शेतकºयांची मोठी अडचण होत आहे. कधी नव्हे कोबी, टमाटे, फ्लॉवर आदी पिकांना शेतकºयांना परवडेल असा या पिकांना बाजारात भाव मिळत आहे. मात्र, मोठ्या मेहनतीने पिकविलेला भाजीपाला काढणीला आलेल्या वेळेतच बºयाच रोगांचा अचानक प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे या पिकांवर केलेला खर्चही पदरात पडतो की नाही अशी अवस्था या पिकांची झाल्याने बळीराजा निसर्गाच्या अवकृपेचा पुन्हा बळी ठरत आहे. या खरिपाच्या पिकांवर शेतकºयांची पुढील हंगामाची आर्थिक भिस्त आहे. हेच पीक हातचे जाऊ लागल्यामुळे शेतकरीवर्गात चिंता व्यक्त होत आहे.

Web Title: Due to various diseases of crops in Naigaon lost season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.