ग्रामपंचायत कार्यालयासमोरील वाहनामुळे संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 07:58 PM2019-04-30T19:58:56+5:302019-04-30T20:05:32+5:30

लासलगाव : येथील मतदान केंद्रावर अतिरिक्त मतदान मशीनीचे काळे पिवळे वाहन उभे न करता लासलगाव ग्रामपंचायत कार्यालया समोर हे वाहन दिसुन आल्याने संशयास्पद शक्यता निर्माण झाली.

Due to vehicular traffic in front of Gram Panchayat office | ग्रामपंचायत कार्यालयासमोरील वाहनामुळे संशय

ग्रामपंचायत कार्यालयासमोरील वाहनामुळे संशय

Next
ठळक मुद्देलासलगाव : अतिरिक्त मतदान यंत्राचे वाहन केंद्राऐवजी अन्यत्र केले उभे

लासलगाव : येथील मतदान केंद्रावर अतिरिक्त मतदान मशीनीचे काळे पिवळे वाहन उभे न करता लासलगाव ग्रामपंचायत कार्यालया समोर हे वाहन दिसुन आल्याने संशयास्पद शक्यता निर्माण झाली.
मतदान प्रक्रि या संपल्यानंतर लगेचच दहा मिनिटात मतदान केंद्रापासून काही अंतरावर एका खाजगी काळीपिवळी गाडीत मतदान मशीन आढळून आल्याने ते बाहेर आलेच कसे? या कारणावरून लासलगाव शहरात मोठा गोंधळ उडाला पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर पोलिस बंदोबस्तात हे मशीन मतदान केंद्रावर नेण्यात आले.
लासलगाव येथील सर्व मतदान केंद्रांवर सहा वाजता मतदान प्रक्रि या पूर्ण झाली एकीकडे मतदान मशीन सील करण्याची प्रक्रि या सुरू असताना लासलगाव ग्रामपंचायतीच्या आवारात एका काळी पिवळी वाहनातून सोनल अधिकारी यांनी ईव्हीएम मशीन सह झेरॉक्स काढण्यासाठी आले होते.
ही बाब तेथे उपस्थित असलेले लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर, लासलगाव महाविद्यालयाचे अध्यक्ष संजय बापू होळकर, गुणवंत होळकर, रामनाथ शेजवळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी ही गाडी अडवून धरली यानंतर मोठा गोंधळ येथे उडाला होता. मतदान प्रक्रि या संपल्या-संपल्या मतदान मशीन बाहेर आलेच कसे व हे मशीन कोणते याबाबतची विचारणा येथे जमलेल्या नागरिकांनी अधिकाºयाला केली मात्र योग्य ती उत्तरे न मिळाल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात संतप्त झाले होते.
लासलगाव पोलीस कार्यालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन वरिष्ठ अधिकाºयांशी नागरिकांचे बोलले करून दिल्यानंतर हे ईव्हीएम मशीन सुरक्षित स्थळी मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्तात नेण्यात आले. या ग्रामपंचायत परिसरात काही वेळ तणावाची परिस्थिती मात्र यानिमित्ताने निर्माण झाली होती.
 

Web Title: Due to vehicular traffic in front of Gram Panchayat office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.