‘त्या’ पोलिसाच्या सतर्कतेमुळे चिमुकली अन् मातेची घडली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:19 AM2021-02-17T04:19:57+5:302021-02-17T04:19:57+5:30
मुंबईनाका परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या नातेवाइकांची प्रकृती बघून चासकर हे पहाटेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीने जेमतेम वेगात ...
मुंबईनाका परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या नातेवाइकांची प्रकृती बघून चासकर हे पहाटेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीने जेमतेम वेगात स्मार्ट रोडवरून मार्गस्थ होत होते. यावेळी अशोक स्तंभाकडून सीबीएसच्या दिशेने बाळाला खांद्यावर घेत पायी चालत येत असलेल्या संशयास्पद पुरुषाने चासकर यांचे लक्ष वेधले. चासकर यांना संशय आल्याने त्यांनी आपली दुचाकी थांबवून तत्काळ त्या इसमाला हटकले. त्यांना त्याच्या हालचालींवरून संशय आल्याने विचारपूस सुरू केली असता त्या संशयिताने उडवाउडवीची उत्तरे देत निसटण्याचा प्रयत्न केला. यावेळी चासकर यांनी त्याला कोठून आला व कोठे चालला? असे विचारले असता त्याने बाळाला घेऊन दवाखान्यात जात आहे’ असे सांगितले; मात्र भल्या पहाटे एकटा पायी चालत जात असल्याने चासकर यांनी त्यास ‘ही मुलगी कोणाची आहे’ असा दुसरा प्रश्न विचारला. यावेळी संशयित माणिक काळे याच्या पायाखालची वाळू सरकली. त्याने तेथून निसटून जाण्याचा प्रयत्न केला असता चासकर यांनी त्यास धरून ठेवले. काही वेळेतच तेथे गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले आणि त्यांनी त्या संशयित काळे यास ताब्यात घेत त्याच्या तावडीतून चिमुकलीची सुटका केली. चासकर यांनी दाखविलेली सतर्कता अन् प्रसंगावधानामुळे तीन दिवसांपासून कुठलाही थांगपत्ता लागू न देणारा अपहरणकर्ता अखेर पोलिसांच्या हाती लागला.
---इन्फो--
...अशी पटविली खात्री
सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याचे तपासी अधिकारी उपनिरिक्षक नाहीद शेख यांच्याशी तत्काळ संपर्क साधून माहिती दिली असता त्यांना त्या संशयित इसमाचे फोटो काढून मोबाइलद्वारे पाठविले. शेख यांनी त्याची ओळख पटवून अतिरिक्त पोलिसांची मदत पाठवीत असल्याचे सांगितले. काही वेळेतच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे गस्तीपथकही न्यायालयाच्या द्वारासमोर येऊन धडकले. तत्काळ बाळाला तपासणीसाठी पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले तर संशयित काळे यास बेड्या ठोकून सरकारवाडा पोलीस ठाण्यात नेले.
---
फोटो आरवर १६ विक्रम नावाने सेव्ह आहे.
===Photopath===
160221\16nsk_30_16022021_13.jpg
===Caption===
पोलीस शिपाई विक्रम चासकर