ममदापूर येथे तरु णांच्या सतर्कतेमुळे पाडसाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 06:50 PM2019-04-05T18:50:28+5:302019-04-05T18:51:29+5:30
ममदापूर : येवला तालुक्यातील ममदापुर येथे दोन तरु णांनी कुत्र्याच्या तावडीतून पाडसाची सुटका करून जीवदान दिले.
येथील राजेंद्र वैद्य व सोपान शिंदे हे तरु ण ममदापूर- रेंडाळा रस्त्याने जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला काही कुत्रे हरणांच्या कळपाच्या मागे धावताना दिसले. त्याचवेळी हरणाच्या चार ते पाच दिवसाच्या पाडसावर काही कुत्रे हल्ला करताना दिसले. त्यांनी लगेचच गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून पाडसाकडे धाव घेतली व पाडसाची सुटका केली. त्यानंतर प्राणी मित्र गोरख वैद्य यांना ही माहिती दिली. त्यांनी यासंदर्भात वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ यांना कळविले. थोड्याच वेळात पोपट वाघ, रविंद्र निकम, बापू वाघ हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पाडसावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पाडसाला राजापूर येथील वनविभागाच्या मुख्य कार्यालयात पोहचविले. पुढील उपचारासाठी वन विभागाचे अधिकारी सदर पाडसाला घेऊन गेले. पाडसाच्या मागील पायाला कुत्र्याने चावा घेतला आहे .परंतु तरूणाच्या सतर्कतेमुळे पाडसाचा जीव वाचल्याने सदर तरु णांचे वनविभागाकडून कौतूक करण्यात आले.