दुगावला महिलेचा विनयभंग चांदवड : संशयिताकडून लुटल्याची विरोधी तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:08 AM2018-04-18T00:08:31+5:302018-04-18T00:08:31+5:30
चांदवड : तालुक्यातील दुगाव येथे महिलेस रस्त्यात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याने सदर महिलेने पोलिसांत तक्रार दिली.
चांदवड : तालुक्यातील दुगाव येथे महिलेस रस्त्यात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याने सदर महिलेने पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दि. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास समीर रमजान शेख याने सदर महिला आपल्या लहान मुलीसह रस्त्याने जात असताना तिचा विनयभंग केला. सदरची घटना या महिलेने आपल्या घरच्यांना सांगितली असता तिचा दीर जाब विचारण्यास गेला असता, त्यालाही दमदाटी केल्याचे फिर्यादीत महिलेने म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास जगताप तपास करीत आहेत. सदर दोन्ही कुटुंबात बऱ्याच वर्षांपासून वैमनस्य असल्याने सदरचा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पैसे गेल्याची फिर्यादही त्यातूनच घडली आहे, असे सांगण्यात आले. चांदवड पोलीस स्टेशनला दोन्ही बाजूंकडून परस्पर फिर्यादी दाखल झाल्या आहेत. पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास चौधरी हे तपास करीत आहेत. घटनेतील संशयित समीर रमजान पठाण, रा. दुगाव याने दिलेल्या फिर्यादीत दि. १४ एप्रिल रोजी ७ वाजेच्या सुमारास मोबीन अन्सार शेख, शाहरूख अन्सार शेख, राजू सिकंदर शेख, शफीक रफिक शेख, सिकंदर अब्दुल शेख, अख्तर अब्दुल शेख सर्व रा. दुगाव यांनी दुगाव बसस्थानकाजवळ संगनमत करून समीर पठाण यास बोलरो पिकअप अडवून त्यास खाली खेचून लाथ्याबुक्यांनी मारहाण केली. पठाण हा गाडी घेऊन जात असताना त्यांच्या खिशातून एक लाख चारशे रुपये सहा जणांपैकी एकाने काढून घेतले, अशी फिर्याद समीर पठाण याने दिली आहे.