दुगाव गटाला दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाचा मान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 10:23 PM2020-01-02T22:23:03+5:302020-01-02T22:23:36+5:30

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी राष्टवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष व दुगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य डॉ.सयाजीराव गायकवाड यांना संधी मिळाल्याने चांदवड तालुक्यात व दुगाव जिल्हापरिषद गटाला दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.

Dugaon Group honors vice president for second term! | दुगाव गटाला दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाचा मान !

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. याप्रसंगी आई सिताबाई , बंधु अशोक गायकवाड, संपुर्ण परिवार.

googlenewsNext
ठळक मुद्देसयाजीराव गायकवाड : राजकीय वारशाचा लाभ

महेश गुजराथी।
चांदवड : जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी राष्टवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष व दुगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य डॉ.सयाजीराव गायकवाड यांना संधी मिळाल्याने चांदवड तालुक्यात व दुगाव जिल्हापरिषद गटाला दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.
यापुर्वी मधुकरराव सोनवणे यांच्या रुपाने जिल्हापरिषद अध्यक्षपद मिळाले होते तर या दुगाव जिल्हा परिषद गटातुन निवडून आलेले शिरीषकुमार कोतवाल यांनाही यापुर्वी उपाध्यक्षपदाची संधी मिळाली होती . याच गटाने कोतवाल यांचे राजकीय पुर्नवसन केल्याने पुन्हा त्यांना आमदारकीची संधी अपक्ष म्हणून मिळाल्याचा इतिहास याच गटाला आहे. त्यांनी आमदारकीची निवडणुक लढविली. त्यांच्या रिक्त जागेवर २००९ मध्ये डॉ.सयाजीराव गायकवाड यांना अडीच वर्ष जिल्हा परिषद सदस्य पदाची पहिली संधी मिळाली होती. तर डॉ. सयाजीराव गायकवाड यांचे वडील माजी आमदार स्व. डॉ. ना.का. गायकवाड यांनी सन १९७९ मध्ये जिल्हा परिषद दुगाव गटातुन मतदारांनी सदस्यांची संधी दिली व लगेच सन १९८० मध्ये ते आमदार झाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे या दुगाव जिल्हा परिषद गटाने जिल्हा परिषद अध्यक्ष, त्या पाठोपाठ उपाध्यक्ष दोनदा संधी देणारा हा मतदार आहे.
माजी आमदार डॉ. ना. का. गायकवाड यांचा राजकीय वारसा लाभल्याने व राष्टÑवादी कॉँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांनी राष्टÑवादी कॉँग्रेस पक्ष संघटन केले तर प्रत्येक आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्या परिवारात आई सिताबाई, मोठे बंधु अशोक गायकवाड, पत्नी डॉ. विजया, मुलगा अनिकेत , मुलगी आर्या , भावजई, पुतणे , काका यांचा समावेश आहे तर त्यांचा मुलगा अनिकेत अहमदाबादमध्ये शिक्षण घेऊन तो पुणे येथे चांगल्या पदावर नोकरीस आहे.

डॉ. सयाजीराव गायकवाड गेल्या अनेक वर्षापासून गंगापूररोडवरील मन्वंतर बंगल्यावर राहतात तर त्यांना पहिल्यापासून व्यायाम व पोहण्याची आवड असून दरवर्षी लोकमतने आयोजित केलेल्या महामॅरेथॉन मध्ये सहभाग घेतात तर दररोज पहाटे ते पोहण्यासाठी उपस्थित असतात हे त्यांचे व्यायामाची गोडी म्हणून विशेष उल्लेख होईल असे काम आहे.

शेतकरी कुटूंबात जन्म
डॉ. गायकवाड उसवाड गावचे रहिवासी असून शेतकरी कुंटूबात जन्म झाला आहे. त्यांना राजकारणाचा वारसा असून त्यांचे मोठे बंधु अशोक गायकवाड सध्या चांदवड तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आहेत. गायकवाड पेशाने डॉक्टर असून त्यांचे शिक्षण बी.ए.एम.एस.आहे. ते चांदवड तालुका राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष असून यापुर्वी ते तीन वेळा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे संचालक राहिले आहेत. सन १९९२ ते १९९७ पाच वर्षे, सन २००२ ते २००७ पाच वर्षे २००७ ते २०१२ असे तीन वेळा ते संचालक होते. ते तीन वेळा पाच पाच वर्ष पुणे विद्यापीठ पुणे सिनेट पदी सदस्य होते.

Web Title: Dugaon Group honors vice president for second term!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.