डांबरीकरणाचे फुटले बिनआवाजी फटाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:27 AM2017-10-17T00:27:04+5:302017-10-17T00:27:10+5:30
विरोधकांची चुप्पी : २६० कोटींच्या रस्ता डांबरीकरणाला विनाचर्चा मंजुरी नाशिक : कुठलाही आवाज नाही, कसलीही चर्चा न करता महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने रस्ता डांबरीकरणासाठी सुमारे २६० कोटी रुपयांच्या कामांना परस्पर मंजुरी देत वसुबारसलाच दिवाळीचे फटाके फोडण्याची किमया साधली. एरव्ही किरकोळ गोष्टींनी महासभेत गोंधळ घालत सत्ताधाºयांना जाब विचारणाºया विरोधकांनीही सोईस्कररीत्या चुप्पी तर साधलीच शिवाय, प्रशासनानेही त्याबाबत तत्परता दाखविल्याने एकूणच भूमिकेबद्दल संशयाचा धूर निघू लागला आहे.
विरोधकांची चुप्पी : २६० कोटींच्या रस्ता डांबरीकरणाला विनाचर्चा मंजुरी
नाशिक : कुठलाही आवाज नाही, कसलीही चर्चा न करता महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने रस्ता डांबरीकरणासाठी सुमारे २६० कोटी रुपयांच्या कामांना परस्पर मंजुरी देत वसुबारसलाच दिवाळीचे फटाके फोडण्याची किमया साधली. एरव्ही किरकोळ गोष्टींनी महासभेत गोंधळ घालत सत्ताधाºयांना जाब विचारणाºया विरोधकांनीही सोईस्कररीत्या चुप्पी तर साधलीच शिवाय, प्रशासनानेही त्याबाबत तत्परता दाखविल्याने एकूणच भूमिकेबद्दल संशयाचा धूर निघू लागला आहे.
सोमवारी (दि.१६) झालेल्या महापालिकेच्या महासभेत भंगार बाजारावर तीन तास चर्चा चालली. आउटसोर्सिंगसह पाणीबिल वाटपाच्या मुद्द्यावर विरोधकांनी हरकती नोंदवल्या. जादा विषयांची पत्रिकाही महासभेत दाखलमान्य करून घेत त्यातील विकासकामांना मंजुरी देण्यात आली. मात्र, महासभेत सुमारे २६० कोटी रुपयांच्या रस्ता डांबरीकरणाचा पुन्हा घाट घातला गेला आहे, याची गंधवार्ताही कुणाला लागू न देता महापौरांनी सदरच्या कामांना मंजुरी दिली. गेल्या दोन-अडीच वर्षांत महापालिकेने रस्त्यांवर सुमारे ७०० कोटींहून अधिक रक्कम खर्च केलेली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे ४७५ कोटी रुपयांचे रस्ते करण्यात आले. त्यात रिंगरोडची कामे झाली. सिंहस्थात अंतर्गत रस्ते झाले नाही म्हणून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा १९२ कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे करण्याला मंजुरी देण्यात आली.
सदर रस्त्यांच्या कामांचे पितळ शहरात झालेल्या पावसाने उघड केले. अद्यापही त्यातील बव्हंशी रस्त्यांवर दुसरा थर पडलेला नाही तर अनेक ठिकाणी डांबरीकरणाची कामेच झालेली नाहीत. आता याच पावसावर खापर फोडत पुन्हा एकदा सुमारे २६० कोटी रुपये खर्चाच्या रस्ता डांबरीकरणाचा घाट घातला गेला आणि सत्ताधाºयांच्या सुरात सूर मिसळत प्रशासनानेही तत्परता दाखवत प्रस्ताव तयार केला. विकासकामांचेच प्रस्ताव मंजूरमहासभा आटोपल्यानंतर पत्रकारांनी महापौर रंजना भानसी यांना २६० कोटी रुपयांच्या रस्ता डांबरीकरणाच्या कामांविषयी विचारणा केली असता, त्यांनी सदर विषय हे विकासकामांचे असल्याने मंजुरी दिल्याचे सांगितले. सदरचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेवर ठेवला होता. तो मागील दाराने मंजूर केला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सहाही विभागातील सर्वच प्रभागांमध्ये रस्त्यांची कामे केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.