ढोल-ताशांच्या गजरात जिल्ह्यात पोळा साजरा

By admin | Published: September 1, 2016 11:58 PM2016-09-01T23:58:07+5:302016-09-01T23:58:21+5:30

गावोगावी मिरवणुका : मारुतीच्या मंदिराला प्रदक्षिणा ; घराघरात मातीच्या बैलांची पूजा

Dump-drum palm celebrates in the district | ढोल-ताशांच्या गजरात जिल्ह्यात पोळा साजरा

ढोल-ताशांच्या गजरात जिल्ह्यात पोळा साजरा

Next

बेलगाव कुऱ्हे : शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कष्ट करणाऱ्या सर्ज्या- राजाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ग्रामीण भागात पोळा या सणाला विशेष महत्त्व आहे. खिल्लारी बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज वातावरणात एक वेगळाच भाव निर्माण करीत होता. पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांनी पोळा साजरा केला.
इगतपुरी तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती करीत असल्यामुळे पोळा हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. शेती करताना बैल अत्यंत महत्त्वाचा उपयोगी प्राणी असून, नांगरणे, वखरणे, मळणी वगैरे सर्व गोष्टी बैलांच्या मदतीनेच करतात. ज्याच्या घरी बैलांची जोडी त्याला पूर्वी धनवान समजले जात. तालुक्यातील अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, नांदूरवैद्य, कुऱ्हेगाव, नांदगाव बुद्रुक, साकूर, पिंपळगाव डुकरा येथे पोळा मोठ्या उत्साहाने अन् ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांनी साजरा केला.
येवल्यात बैलपोळ्याची मिरवणूक
येवला : दुष्काळाची पार्श्वभूमी असली तरी येवला शहरात गुरु वारी सायंकाळी साडेसहा वाजता बैलपोळ्याची मिरवणूक, बैलांची संख्या कमी असली तरी, ढोल- ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात काढण्यात आली.
बैलं कमी आणि माणसे अधिक असली तरी तब्बल दोन तास मिरवणूक चालली. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता येथील गंगादरवाजा भागात सर्व शेतकरी त्यांच्या सजवलेल्या बैलांसह एकत्रित झाले. अग्रभागी राजे रघुजीराजे शिंदे यांचे वंशज भास्करराव शिंदे, अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांच्या घराण्याचा, डोक्यावर बाशिंग धारण केलेला मानाचा बैल बँडच्या व ढोल-ताशांच्या गजरात खंडू वस्ताद तालीम संघाच्या प्रांगणात आला आणि मिरवणुकीला सुरुवात झाली. मानाच्या बैलाचा कासरा भास्करराव शिंदे, शाहू शिंदे, अरविंद शिंदे यांच्या हातात होता.
मुकुंदराव पोफळे, नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे आदि सुमारे ४० शेतकऱ्यांचे बैल या मिरवणुकीत सहभागी झाले होते. दुष्काळी पार्श्वभूमीमुळे डोक्यावर मानाचे बाशिंग होते. अंगावर रंगरंगोटी आणि शानदार अशी झूल पांघरलेली होती. नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे यांच्या बैलांच्या ताफ्यापुढे ढोल-ताशांचा गजर चालू होता. प्रताप परदेशी यांनी आपले सफेद घोडेदेखील सजवून मिरवणुकीत आणले होते. गुरु वारी रात्री ९ वाजता मिरवणूक आटोपली. मानाच्या बैलाने प्रथम येथील मोठे महादेव मंदिराच्या पायरीवर माथा टेकवला. त्यानंतर मिरवणुकीत सहभागी सुमारे २०० बैलांनी महादेवाचे दर्शन घेतले. राजे रघुजी शिंदे यांच्या मंदिरात दर्शन घेऊन मिरवणूक संपली. रात्री उशिरापर्यंत बैलांची पूजा प्रत्येक अंगणात होतानाचे चित्र दिसले.
मिरवणुकीत सुभाष मगर, सुदाम शिंदे, यतिन पटेल, अनिल कुक्कर, दत्ता निकम, प्रभाकर शिंदे, नानासाहेब शिंदे, सुबोध शिंदे, राकेश शिंदे यांच्यासह शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Dump-drum palm celebrates in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.