इगतपुरी रेल्वे स्थानकात पहाटेपासून दुरंतो थांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 06:03 PM2019-08-04T18:03:23+5:302019-08-04T18:04:14+5:30

इगतपुरी :मुंबईत तुफान पाऊस सुरू असल्याने याचा मध्य रेल्वेवर परिणाम झाला असुन अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.इगतपुरी रेल्वे स्थानकात पहाटे चार वाजेपासून दीड हजार प्रवाशी असलेल्या दुरंतो एक्सप्रेस उभी आहे.काल मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने जोर धरल्याने मुंबई व कसारा रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई व कसारा अप व डाऊनची वाहतूक ठप्प झाली आहे.

 Duranto stopped at Igatpuri train station from dawn | इगतपुरी रेल्वे स्थानकात पहाटेपासून दुरंतो थांबविली

इगतपुरी रेल्वे स्थानकात पहाटेपासून दुरंतो थांबविली

Next
ठळक मुद्देरद्द केलेल्या गाड्या : - राज्यराणी एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस, या गाड्या रद्द करण्यात आल्या असून गेल्या 27 तारखेपासून पुणे भुसावळ एक्सप्रेस ही गाडी मनमाड वाया वळवण्यात आली आहे. तर चाकरमान्यांची लाईफ लाईन समजली जाणारी पंचवटी एक्सप्रे



इगतपुरी :मुंबईत तुफान पाऊस सुरू असल्याने याचा मध्य रेल्वेवर परिणाम झाला असुन अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.इगतपुरी रेल्वे स्थानकात पहाटे चार वाजेपासून दीड हजार प्रवाशी असलेल्या दुरंतो एक्सप्रेस उभी आहे.काल मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने जोर धरल्याने मुंबई व कसारा रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई व कसारा अप व डाऊनची वाहतूक ठप्प झाली आहे.  इगतपुरी रेल्वे स्थानकात पहाटे चार वाजेपासून दीड हजार प्रवाशी असलेल्या दुरंतो एक्सप्रेस उभी असून त्याचबरोबर सकाळी साडेसहाला येणारी येणारी मंगला एक्स्प्रेस आज इगतपुरी रेल्वे स्थानकात आठ वाजता दरम्यान आली. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले तर रेल्वे प्रशासनाकडुन प्रवाशांना कुठल्याही प्रकारची सुविधा करण्यात आलेली नाही. दुरांतो एक्सप्रेस मध्ये लहान मुले व महीला मोठया प्रमाणात असुनरेल्वे प्रशासनाकडुन कोणत्याही प्रकारची खानपानची व्यवस्था केली नसल्याने प्रवाशी वर्गाने नाराजी व्यक्त केली .
याबाबत रेल्वे प्रशासनाला विचारणा केली असता, आम्ही सर्व सोयी पुरविल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रवाशांपर्यंत कोणतीच सुविधा अथवा खानपानची व्यवस्था न पोहचल्याने रेल्वे प्रवाशांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला.
मात्र १०ते१२ तास पासुन रेल्वे स्थानकावर उभी असलेल्या प्रवाशांना एक सामाजिक बांधिलकी म्हणुन शहरातील नगरसेवक दिनेश कोळेकर व जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर तसेच डॉक्टर प्रदीप बागल यांनी प्रवाशांसाठी दुरतो एक्सप्रेस च्या प्रवाशांना चहा ,पाणी , नाष्टा, अल्पउपहार ,जेवणाची सुविधा ,तसेच कुणी प्रवाशी आजारी असल्यास डॉ प्रदीप बागल यांनी वैद्यकीय तपासणी करु न प्रवाशांना प्राथमिक उपचार करण्यात आले यावेळी त्यांचे प्रवाशांनी आभार व्यक्त केले.तर पुढे कधी जाणार याची काळजी प्रवाशांना पडली आहे.
तसेच सकाळी आठ वाजता आलेली मंगला एक्सप्रेस दुपारी एक वाजता इगतपुरी रेल्वे स्थानकात रद्द् करून पुन्हा मनमाड ,दौंड सोलापुर मार्गी रेणुगुंटा , एरणा कुरलम जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. या मुळे प्रवासी वर्गात मोठी नाराजी पसरली होती मात्र पावसाअभावी हा निर्णय घेण्यात आला आह.े अशी रेल्वे प्रशासना सांगितले.
दुरतो एक्सप्रेस मध्ये जवळ पास एक ते दीड हजार प्रवासी होते .
दुरंतो एक्सप्रेस मधील काही प्रवाशांनी रेल्वे स्थानकातून बाहेर येऊन खाजगी वाहनांनी प्रवास केला
तर रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले की पाऊस कमी झाल्यास रेल्वे पुन्हा पूर्वपदावर येईल.

Web Title:  Duranto stopped at Igatpuri train station from dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.