युवती, महिलांनी स्वरक्षणासाठी दुर्गा व्हावे-आदित्य ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 06:16 PM2018-08-24T18:16:57+5:302018-08-24T18:18:50+5:30
महिला व युवतींकडे लक्ष्मी, सरस्वती म्हणून बघितले जाते. मात्र कोणी त्रास देत असेल व छळ करीत असेल तर स्वरक्षणासाठी कालीमाता व दुर्गादेवी व्हा, तुमचा आवाज तुमचे शस्त्र होऊ शकते असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
मालेगाव (नाशिक) : महिला व युवतींकडे लक्ष्मी, सरस्वती म्हणून बघितले जाते. मात्र कोणी त्रास देत असेल व छळ करीत असेल तर स्वरक्षणासाठी कालीमाता व दुर्गादेवी व्हा, तुमचा आवाज तुमचे शस्त्र होऊ शकते असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
मालेगावी शिवसेना व युवा सेनेतर्फे महाआरोग्य शिबिर, शैक्षणिक व जातीचे दाखले वाटप, महिला व युवतींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियममध्ये विद्यार्थिनी व महिलांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले की, बाहेर जाताना भीती वाटत असेल तर मनातील भीती घालविणे गरजेचे असते. स्वरक्षण करता आले पाहिजे, बचावाच्या वेळी तुमचा आवाज तुमचे शस्त्र होऊ शकते. तत्पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटना नंतर ठाकरे म्हणाले की, तुमच्या हातात असलेला भगवा पुढच्या वर्षी मंत्रालयावर फडकणार आहे. महाराष्टÑाच्या काना-कोपऱ्यातुन रुग्ण मुंबईत उपचारासाठी येत असतात. याची दखल घेत राज्यभर आरोग्य शिबिरे राबविण्याचा निर्णय घेतला. यावेळी ठाकरे यांचा युवासेना व शिवसेनेतर्फे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, अविष्कार भुसे, विनोद वाघ, चंद्रकांत पठाडे आदिंसह पदाधिकाºयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, युवा सेनेच्या माध्यमातुन महिलांना व युवतींना स्वरक्षणाचे धडे दिले जात आहेत. तसेच राज्यभर आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत. विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन तसेच शहर व तालुक्यातील युवकांसाठी आदित्य ठाकरे यांनी पूर्ण एक दिवस द्यावा असे साकडे भुसे यांनी घातले.
युवासेने प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याहस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात जातीचे व शैक्षणिक दाखले, संजय गांधी योजनेचे मंजुरी आदेशाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास आमदार नरेंद्र दराडे, उदय सांगळे, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, उपमहापौर सखाराम घोडके, स्थायी समिती सभापती जयप्रकाश बच्छाव, शिवसेना संपर्क नेते प्रमोद शुक्ला, तालुका प्रमुख संजय दुसाने, महानगर प्रमुख रामा मिस्तरी उपस्थित होते. सूत्रसंचलन अॅड. दुसाने व प्रमोद शुक्ला यांनी केले.