विश्रामगडावर दुर्गपूजन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:01 PM2020-02-24T23:01:10+5:302020-02-25T00:27:36+5:30

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील जनसेवा मित्रमंडळ व आशीर्वाद प्रतिष्ठान यांच्या वतीने विश्रामगडावर दुर्गपूजन करण्यात आले. शिवाजी ट्रेल या संस्थेतर्फेगेल्या २५ वर्षांपासून दरवर्षी महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर दुर्गपूजन करण्यात येते. २५ वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील १० किल्ल्यांवर दुर्र्गपूजन करून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.

Durga Pujan on the Sabbath | विश्रामगडावर दुर्गपूजन उत्साहात

सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या विश्रामगडावर दुर्गपूजन कार्यक्रमाप्रसंगी ठाणगाव येथील अशोक कचरे, सुनील भोर, रमेश खोलमकर, ज्ञानेश्वर भोर, अंकुर काळे, अर्जुन आव्हाड आदींसह दुर्गप्रेमी.

Next

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील जनसेवा मित्रमंडळ व आशीर्वाद प्रतिष्ठान यांच्या वतीने विश्रामगडावर दुर्गपूजन करण्यात आले. शिवाजी ट्रेल या संस्थेतर्फेगेल्या २५ वर्षांपासून दरवर्षी महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर दुर्गपूजन करण्यात येते. २५ वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील १० किल्ल्यांवर दुर्र्गपूजन करून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
सन २०१६ मध्ये १३१ किल्ल्यांवर दुर्गपूजन करण्यात आले. त्याची लिम्का बुक आॅफ रेकॉड्समध्ये नोंद झाली आहे.
दरवर्षी हे पूजन फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी केले जाते. येथील प्रगतिशील शेतकरी अर्जुन आव्हाड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी जनसेवा मंडळाचे रामदास भोर, आशीर्वाद प्रतिष्ठान नाशिकचे दिनेश वासदानी, नितीन धारबळे, विष्णू बोराडे, उस्मानाबाद येथील संगमेश टोकरे, रोहित देशपांडे, धुळे येथील माळोदे दांपत्य यांच्यासह नाशिक, मुंबई, पुणे येथील दुर्गप्रेमी उपस्थित होते.

Web Title: Durga Pujan on the Sabbath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.