दुगावला महिला सक्षमीकरण मेळावा
By admin | Published: December 16, 2015 11:41 PM2015-12-16T23:41:53+5:302015-12-16T23:48:09+5:30
दुगावला महिला सक्षमीकरण मेळावा
दुगाव : येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक
शाळेच्या प्रांगणात महिला सक्षमीकरण मेळावा संपन्न झाला. सभापती अनिता जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य यू. के. अहेर, उपसरपंच द्रौपदाबाई जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जायभावे, पर्यवेक्षक पाटील, एन. एन. गोजरे, डी. एम. पाटील व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाड, ग्रामपंचायत, दुगाव व महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, दुगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा घेण्यात आला.
महिलांचे आरोग्य, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, दारूबंदी, स्त्रीभ्रूण हत्त्या, महिलांमध्ये आढळून येणारे रक्ताक्षयाचे अधिक प्रमाण, शारीरिक, मानसिक आरोग्य आदि विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यास किशोरवयीन मुली, महिला उपस्थित होत्या. महिलांचे वजन, उंची, एचबी, बीएमआय आदि तपासण्या करण्यात आल्या. आर. एन. बागुल, सागर करंजकर, एस. एल. केरुर, डी. टी. सानप, व्ही. टी. अहिरे, आर. एस. नवले, श्रीमती एम. टी. बागल, सुनीता गांगुर्डे, आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. सूत्रसंंचालन आर. एस. नवले यांनी केले. एस. एल. केरुर यांनी आभार मानले. (वार्ताहर)