‘दुर्गदुर्गा’ उपक्रमांतर्गत रामशेज येथे दुर्गभ्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:37 AM2018-06-19T00:37:29+5:302018-06-19T00:37:46+5:30
नाशिक : येथील आयाम संस्थेच्या वतीने दुर्गदुर्गा या उपक्रमांतर्गत रामशेज किल्ला येथे दुर्गभ्रमण हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, या उपक्रमांतर्गत लहान मुलींपासून सत्तरीपुढील महिला अशा २५० पेक्षा जास्त महिलांनी रामशेज किल्ल्यावर दुर्गभ्रमणसाठी चढाई केली.दुर्गदुर्गा हा महिलांनी महिलांसाठी सुरू केलेला स्तुत्य उपक्रम असून यामुळे महिलांना नवीन दिशा, नवी ऊर्जा मिळू शकेल, असे मत यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केले.याप्रसंगी पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे, सरपंच जिजा तांदळे, शुभदा देसाई, योगीता खांडेकर आदी उपस्थित होते. शुभदा देसाई यांनी संस्थेच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. प्रशांत परदेशी यांनी यावेळी रामशेज किल्ल्याची माहिती दिली. यावेळी संगीता बेणी, सुषमा मिसाळ, शैला वाणी, अमृता जतकर, वसुधा पाटील, योगीता खांडेकर, विद्या करवंदे, पूजा गायधनी, नीलेश गायधनी आदी उपस्थित होते. हेमांगी दांडेकर यांनी सूत्रसंचालन केले.