महिला पदाधिकाºयांचा दुर्गावतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 11:47 PM2018-10-04T23:47:01+5:302018-10-04T23:47:16+5:30
नाशिक : शक्ती आणि सक्षमतेचे प्रतीक असलेल्या नवदुर्गांचा नवरात्रोत्सव तोंडावर आलेला असताना नाशिक जिल्हा परिषदेतील अधिकाºयांना महिला पदाधिकाºयांचा दुर्गावतार पाहायला मिळाला. प्र
नाशिक : शक्ती आणि सक्षमतेचे प्रतीक असलेल्या नवदुर्गांचा नवरात्रोत्सव तोंडावर आलेला असताना नाशिक जिल्हा परिषदेतील अधिकाºयांना महिला पदाधिकाºयांचा दुर्गावतार पाहायला मिळाला. प्रशासकीय अधिकाºयांमुळे विकासकामांचे नियोजन रखडले असून, विविध अधिकारी पदाधिकाºयांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाढत्या फाइल पेंडन्सीवर महिला पदाधिकारी उपाध्यक्ष नयना गावित यांच्यासह बांधकाम सभापती मनीषा पवार आणि महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर यांनी अधिकाºयांची चांगलीच कानउघाडणी केली, तर प्रशासनाच्या हलगर्जी कामकाजावर नाराजी व्यक्त करतानाच मुख्य कार्यकारी अधिकारी आल्याशिवाय सभा न घेण्याची भूमिका अध्यक्ष शीतल सांगळे यांनी घेत स्थायी समितीची सभा तहकूब केली.
जिल्हा परिषद स्थायी समितीची मासिक सभा गुरुवारी (दि.४) अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. मात्र, सभेच्या सुरुवातीस डॉ. भारती पवार यांच्यासह समिती सदस्यांनी निधी नियोजनाचा प्रश्न उपस्थित करीत झालेले नियोजन सादर करण्याची मागणी केली. परंतु, अधिकाºयांना नियोजन सादर करता आले नाही. त्यामुळे सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत सभेला मुख्यकार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या अनुपस्थितीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. सहा-सहा महिन्यांपासून फाइलींवर स्वाक्षरी होत नसल्याची सभापती यतिंद्र पगार, सुनीता चारोस्कर, अर्पणा खोसकर यांनी व्यक्त केली, तर उपाध्यक्ष नयना गावित यांनी त्यांच्या वाडीवºहे गटातील पाण्याच्या टाकीची फाइल चक्क दीड वर्षापासून प्रलंबित असल्याचे सांगत प्रशासनाच्या कामकाजातील दिरंगाईचा पाढाच वाचला. मुख्य कार्यकारी अधिकारी सभेला नसतील तर सभेत निर्णय कोण घेणार? असा सवाल उपस्थित करतानाच सप्टेंबरअखेर टंचाई आराखडा सादर करावयाचा असतानाही तो सादर केलेला नाही, त्यामुळे टँकर बंद करण्याची नामुष्की ओढविल्याचे डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
पदाधिकाºयांची सभा न घेण्याची मागणीजिल्ह्यात स्वाइन फ्लू, डेंग्यूचे थैमान असताना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी साधी आढावा बैठकही घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. सभापती यतिंद्र पगार यांनीही मागील वर्षातील कामांचे कार्यारंभ निघालेले नसल्याचे सभागृहाच्या समोर आणले. त्यावर, सर्वच सदस्य अन् पदाधिकाºयांनी ही सभा न घेण्याची मागणी अध्यक्ष सांगळे यांच्याकडे केल्याने त्यांनी सभा तहकूब केली.