काय सांगता? १३ लाख विद्यार्थ्यांना पावला कोरोना; परीक्षा न देताच झाले पास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 03:33 PM2021-12-30T15:33:55+5:302021-12-30T15:51:12+5:30
नाशिक : कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व ...
नाशिक : कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांसह पहिली ते नववी व अकरावीच्याही शैक्षणिक वर्ष २०२१ परीक्षा रद्द केल्या. त्यामुळे या सर्वच परीक्षा न देता पास होण्याचा निकाल हातात पडल्याने या विद्यार्थ्यांना कोरोनाच पावल्याची भावना व्यक्त शैक्षणिक वर्तुळात व्यक्त होत आहे. यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना परीक्षा अनिवार्य नसल्या तरी शालेय स्तरावर मूल्यांकन चाचणीही होऊ न शकल्याने जिल्ह्यातील सुमारे १३ लाख विद्यार्थी कोणत्याही परीक्षेविना पास झाल्याने शैक्षणिक क्षेत्रातील ही घटना लक्षवेधी ठरली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चे विद्यार्थी
वर्ग - विद्यार्थी
पहिली - ११७०४५
दुसरी -१२१३४२
तिसरी -१२०६१८
चौथी -१२३९३९
पाचवी - १२२७४३
सहावी -१२०६४५
सातवी -११८३३२
आठवी -११५९१०
नववी -१११४२१
दहावी -९८९४९
अकरावी - ६८१६० बारावी -६८९१८
जिल्ह्यातील एकूण शाळा -५६२६
जिल्ह्यातील एकूण शिक्षक - ४१२१७
दहावीचा निकाल असा
कोरोना संकटामुळे राज्य शासनाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अनुकरण करीत राज्य शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या जाणारी शालान्त परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने गुणदान करून दहावीचा निकाल दि. १६ जुलैला जाहीर केला. यात नाशिक जिल्ह्यातून दहावीत प्रवेशित ९८ हजार ९४९ परीक्षेला प्रविष्ट ९२ हजार २३६ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ९२ हजार २१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ४९ हजार ४२७ मुले (९९.९६ टक्के) व ४२ हजार ४८३ (९९.९७) मुलींचा समावेश असल्याने नेहमीप्रमाणे अंतर्गत मूल्यांकन पद्धतीतही उत्तीर्णतेच्या प्रमाणात मुलींनीच बाजी मारली.
बारावीचा निकाल असा
नाशिक जिल्ह्यात बारावीत ६८ हजार ९१८ विद्यार्थी प्रवेशित होते. त्यांपैकी ६८ ५१६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यांतील ६८ हजार २२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले; तर नाशिक विभागातून या वर्षी ९९.५६ मुलांसह ९९.६७ मुली उत्तीर्ण झाल्या असून, उत्तीर्ण मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण ०.११ टक्क्यांनी अधिक आहे.