कोरोनाकाळात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी उचलला रुग्ण बरे करण्याचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:10 AM2021-06-30T04:10:08+5:302021-06-30T04:10:08+5:30

जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात अपुरे कर्मचाऱ्यांची उणीव भरून काढण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य यंत्रणेमार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती ...

During the Coronation period contract health workers carried the burden of healing patients | कोरोनाकाळात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी उचलला रुग्ण बरे करण्याचा भार

कोरोनाकाळात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी उचलला रुग्ण बरे करण्याचा भार

Next

जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात अपुरे कर्मचाऱ्यांची उणीव भरून काढण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य यंत्रणेमार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. त्यात डॉक्टर, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा एंट्री ऑपरेटर, औषधनिर्माण अधिकारी, वॉर्डबॉय अशा विविध प्रकारचे ३७७ पदे भरण्यात आली. परंतु तिसऱ्या लाटेचा संभाव्य विचार करून ही पदे कायम ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

-----------------

जिल्ह्यात किती कंत्राटी कर्मचारी घेतले- ६७५

नंतर किती जणांना कमी केले- ६०

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सध्या कामावर असलेले कर्मचारी- ६७५

------

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडू लागल्याने शासनाच्या आदेशान्वये कंत्राटी पद्धतीने आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. त्यानंतर मात्र काहीसा दिलासा मिळू लागताच दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढला व याच कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठीही या कर्मचाऱ्यांची सेवा कायम असेल.

- डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी

-------------

कोरोनाच्या काळात आरोग्य विभागाने केलेल्या कंत्राटी भरतीत रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली. या काळातील मानधन शासनाकडून वेळच्या वेळी अदा करण्यात आल्याने तात्पुरत्या स्वरूपात का असेना रोजगाराचा प्रश्न सुटला

- सुनंदा देशमुख

----------

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने आमची भरती करण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षापासून कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड हेल्थ सेंटरमध्ये कामाची संधी मिळाली व अनुभवही घेता आला. खासगी रुग्णालयांमध्ये पुरेसे मानधन मिळत नसल्याने शासनाच्या सेवेत हा प्रश्न सुटला.

- अनिल बोंदार्डे

----------

कोविडकाळात कंत्राटी कामगार म्हणून आरोग्य अभियानांतर्गत सेवा करण्याची संधी मिळाली होती. परंतु काही कौटुंबिक कारणामुळे मधूनच सेवा समाप्त करावी लागली.

- अनिल देवरे

Web Title: During the Coronation period contract health workers carried the burden of healing patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.